नोकरी लावण्यासाठी शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नराधमाला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप

नोकरीसाठी एका गरजू महिलेने अर्ज केला होता. या नोकरीच्या बदल्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने या असाह्य महिलेकडे शरीरसुख देण्याची मागणी केली होती. या नराधमाने पीडित महिलेला वारंवार फोन करून दबाव टाकून माझी पत्नी नसल्याने नोकरीच्या बदल्यात शरीरसुख देण्याची मागणी केली.

नोकरी लावण्यासाठी शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नराधमाला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप
नोकरी लावण्यासाठी शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नराधमाला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 11:40 PM

नवी मुंबई : नेरुळ येथील एका संस्थेत कामाला लावण्यासाठी शरीर सुखा (Physical Relation)ची मागणी करणाऱ्या नराधमाला मनसे (MNS)च्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमाला चांगलाच चोप दिलाय. नोकरीसाठी एका गरजू महिलेने अर्ज केला होता. या नोकरीच्या बदल्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने या असाह्य महिलेकडे शरीरसुख देण्याची मागणी केली होती. या नराधमाने पीडित महिलेला वारंवार फोन करून दबाव टाकून माझी पत्नी नसल्याने नोकरीच्या बदल्यात शरीरसुख देण्याची मागणी केली. तसेच या पीडित महिलेला स्विय सहाय्यक म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून वाशी येथील लॉजमध्ये बोलवले. यावेळी हा नराधम लॉज मध्ये आला असता मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमाला रंगेहाथ पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. (MNS activists beat up a person seeking physical relation in order to get a job)

डोंबिवलीत वृद्ध महिलेचा रुग्णालयात विनयभंग

उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या एका 75 वर्षीय महिलेचा वॉर्डबॉयने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना वॉर्डबॉयने तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरुन वृद्धेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी वॉर्डबॉयला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. कानादास वैष्णव असे अटक करण्यात आलेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे. डोंबिवलीतील स्पर्श हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली आहे.

साताऱ्यात अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार

पाटण येथील अल्पवयीन व मतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली. पाटण येथील एक महिला 27 जानेवारी 2022 ते 18 फेब्रुवारी 2022 या दरम्यान तिच्या परिचयाच्या एका अल्पवयीन व गतीमंद मुलीचा गैरफायदा घेऊन तिला बाहेर फिरायला नेण्याचे, बाहेर खाऊ खायला देण्याचे व पैसे देण्याचे आमिष दाखवून तिला बाहेर घेऊन जात असे. त्यानंतर तिची पाटण व आजूबाजूचे परिसरातील लोकांशी ओळख करून देऊन त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. पाटण व आजूबाजूच्या परिसरातील आठ लोकांनी सदर अल्पवयीन व मतीमंद पिडीत मुलीवर वेळोवेळी व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार बलात्कार केला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पाटण पोलीस करत आहेत. (MNS activists beat up a person seeking physical relation in order to get a job)

इतर बातम्या

Worli Blast : वरळी येथील घरगुती गॅस सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या मुलाला 15 लाख रुपयांची आर्थिक मदत

थेट अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचा बोगस आदेश काढल्याने खळबळ, अधिकाऱ्यांना कसं गंडवलं?

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.