VIDEO : मनसे मराठी भाषेवरुन पुन्हा आक्रमक, वाशी टोल नाक्याच्या कर्मचाऱ्याला चोप

मराठी भाषेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाली आहे (MNS party workers beat vashi tollnaka employee).

VIDEO : मनसे मराठी भाषेवरुन पुन्हा आक्रमक, वाशी टोल नाक्याच्या कर्मचाऱ्याला चोप
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 5:46 PM

नवी मुंबई : मराठी भाषेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाली आहे. मराठीमध्ये न बोलल्याने आणि अरेरावी केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्यावरील एका कर्मचाऱ्याला चोप दिला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओत संबंधित व्यक्ती माफी मागताना दिसत आहे (MNS party workers beat vashi tollnaka employee).

याप्रकरणाबाबत मनसेचे नवी मुंबईचे पदाधिकारी जगदीश खांडेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्हाला आमच्या मनसेच्या नवी मुंबई टीमवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यांनी जे काम केलं आहे ते कौतुकास्पद आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत ती व्यक्ती बोलत होती. तुमच्या राज ठाकरेला सांगा, अशाप्रकारे ती व्यक्ती बोलत होती. आज राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शंभर पेक्षा जास्त केसेस स्वत:वर घेतल्या आहेत. त्यामुळे अशाप्रकारचा अपमान सहन केला जाणार नाही. अशाप्रकारे अपमान करणाऱ्यांना चोप दिलाच जाईल. तो परप्रांतीय व्यक्ती आहे. त्याला मराठी शिकवा एवढाच आमचा कार्यकर्ता म्हणाला होता. तर त्या व्यक्तीने उलट उत्तर दिलं”, असं स्पष्टीकरण खांडेकर यांनी दिलं (MNS party workers beat vashi tollnaka employee).

व्हिडीओत नेमकं काय घडतंय?

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओत संबंधित व्यक्ती आपल्या वागणुकीबाबत माफी मागताना दिसत आहे. “काल वाशी टोल नाक्यावर एका ग्राहकासोबत बोलताना माझ्याकडून जी गैरवर्तवणूक झाली त्याबद्दल माफी मागतो. माझ्याकडून चुकून एक वाक्य आलं. मी राज ठाकरे यांची माफी मागतो. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही”, अशा शब्दात टोल कर्मचारी माफी मागताना दिसत आहे. माफी मागितल्यानंतर तो आपल्या जागेवर उभा राहतो. यावेळी मनसेचे काही पदाधिकारी त्याला चोप देताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

हेही वाचा : मध्ये काही बातम्या वाचायला मिळाल्या, पण त्यात माझीही चूक : अजित पवार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.