कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नवी मुंबई महापालिका सज्ज, आयुक्तांकडून आरोग्य सुविधांचा आढावा

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर्सची जाणवलेली कमतरता लक्षात घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या नेरुळ आणि ऐरोली या दोन्ही रुग्णालयांमध्ये कोव्हिड उपचारार्थ आयसीयू आणि व्हेंटिलेटर्सची सक्षम सुविधा निर्मिती करण्यात येत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नवी मुंबई महापालिका सज्ज, आयुक्तांकडून आरोग्य सुविधांचा आढावा
तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 12:39 PM

नवी मुंबई : कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर्सची जाणवलेली कमतरता लक्षात घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या नेरुळ आणि ऐरोली या दोन्ही रुग्णालयांमध्ये कोव्हिड उपचारार्थ आयसीयू आणि व्हेंटिलेटर्सची सक्षम सुविधा निर्मिती करण्यात येत आहे. कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने वाढविण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधा, ऑक्सिजन प्लान्ट आणि सिलेंडर, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ, औषधे याबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून नियमित बारकाईने आढावा घेतला जात आहे.

रुग्णांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्या आणि आयपीडी सेवा कुठल्याही प्रकारे खंडित होणार नाहीत याविषयी दोन्ही रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून आयुक्तांनी बारकाईने निरीक्षण केले. तशा प्रकारचे निर्देश वैद्यकीय अधिक्षकांना दिले. या दोन्ही रूग्णालयात वरील दोन मजल्याची कामे अखेरच्या टप्प्यात असून ती पूर्ण होताच खालील मजल्यांवर सुरू असलेल्या ओपीडी आणि आयपीडी सेवा त्या मजल्यांवर स्थलांतरित कराव्यात आणि अभियांत्रिकी विभागाने खालील मजल्यांवरील काम तत्परतेने पूर्ण करावे, असेही निर्देश आयुक्तांनी दिले. हे करीत असतानाच महानगरपालिकेच्या तुर्भे आणि बेलापूर रूग्णालयांचे सक्षमीकरण करण्याची कामे पूर्ण करावीत, असे अभियांत्रिकी विभागास निर्देशित करण्यात आले.

या दोन्ही रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे आणि ट्रायेज क्षेत्राची व्यवस्था असेल त्याचीही पाहणी आयुक्तांनी केली. तेथील सुव्यवस्थेच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. याठिकाणी एअर हँडलींग युनिट (एएचयू) बसविण्याचे काम मनुष्यबळ वाढवून एकाचवेळी सर्व युनीट्स बसविण्याची कामे समांतर सुरू ठेवून तत्परतेने पूर्ण करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. एएचयू युनिटच्या रूममधील अॅकॉस्टिकचे काम काळजीपूर्वक करावे, जेणेकरून त्याच्या आवाजाचा त्रास रुग्णांना होणार नाही याची दक्षता घेण्याचेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

कोरोनाबाधित गर्भवती आणि प्रसूती झालेल्या महिलांसाठी विशेष वॉर्ड

तसेच शहरातील बालरोग तज्ज्ञांशी विचारविनीमय करून दोन्ही रुग्णालयात कोरोनाबाधित मुलांसाठी स्वतंत्र पेडियाट्रिक वॉर्ड निर्माण करण्यात येत आहे. त्याची पाहणी करताना त्यामधील अंतर्गत रचनेविषयी आयुक्तांनी महत्वाच्या सूचना केल्या. तसेच कोरोनाबाधित गर्भवती आणि प्रसूती झालेल्या महिलांसाठी असलेल्या विशेष वॉर्डबाबतही सर्व सविधा परिपूर्ण असाव्यात याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. दोन्ही रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन टँकच्या जागांची पाहणी आयुक्तांनी केली आणि ही कामे गतीमानतेने करण्याचे निर्देशित केले. तसेच नेरूळ रूग्णालयात सुरू असलेल्या आरटी पीसीआर लॅबच्या विस्तारित कामाचीही पाहणी त्यांनी केली.

सद्यस्थितीत सामान्य रुग्णालयाचे कोव्हिड रूग्णालयात रूपांतरण कामाच्या पहिल्या टप्प्यामध्ये नेरुळ रूग्णालयात सहाव्या आणि सातव्या तसेच ऐरोली रूग्णालयात चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील काम अंतिम टप्प्यात आहे. येथील कामे तत्परतेने करताना गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारे तडजोड करू नये, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. विशेषत्वाने इलेक्ट्रिकल कामे अतिशय काळजीपूर्वक करावीत, त्या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आगीसारखी दुर्घटना घडण्याचा धोका असतो, हे लक्षात घेऊन डोळ्यात तेल घालून कामे करावीत, अशा शब्दात आयुक्तांनी आदेश दिले. कोणतेही काम करताना वेळ आणि गुणवत्ता यांचा ताळमेळ राखणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या :

परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी नवी मुंबई महापालिकेची विशेष लसीकरण मोहीम

गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महानगरपालिकेसह पोलीस सज्ज, कोव्हिड नियमांचं पालन करण्याचं आयुक्तांचं आवाहन

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.