सायन-पनवेल महामार्गावर राजकीय पक्षांच्या जाहिराती, काही ठिकाणी कंटेनरमध्ये अनधिकृत कार्यालयं, प्रभाग अधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्वासन

मुंबई पुणे द्रुत गती महामार्गावरुन मुबंईत प्रवेश करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या (Political Banner And Advertisement On Direction Viewer) असलेल्या कळंबोली येथील मॅक्डोनाल्ड नाका येथे असलेल्या दिशा दर्शक फलकावर राजकीय पक्षांच्या जाहिराती झळकताना दिसत आहेत.

सायन-पनवेल महामार्गावर राजकीय पक्षांच्या जाहिराती, काही ठिकाणी कंटेनरमध्ये अनधिकृत कार्यालयं, प्रभाग अधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्वासन
Navi Mumbai Banner Issue
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 10:59 AM

नवी मुंबई : मुंबई-पुणे द्रुत गती महामार्गावरुन मुबंईत प्रवेश करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या (Political Banner And Advertisement On Direction Viewer) असलेल्या कळंबोली येथील मॅक्डोनाल्ड नाका येथे असलेल्या दिशा दर्शक फलकावर राजकीय पक्षांच्या जाहिराती झळकताना दिसत आहेत. आपल्या प्रसिद्धीची हौस भागवण्याकरता फलक बाजी करुन नवख्या वाहन चालकांना रस्ता भरकटवण्याचे काम करणाऱ्या तताकथित राजकीय पुढाऱ्यांमुळे भविष्यात या भागात मोठा आपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे (Political Banner And Advertisement On Direction Viewer Ward Officer Gave Assurance For Action).

मुबंई-पुणे द्रुतगती महामार्गे राज्य भरातून मुबंई तसेच ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असून, महामार्ग संपताच वाहन चालकांना योग्य दिशेचे मार्गदर्शन व्हावे या हेतूने कळंबोली येथील मॅक्डोनाल्ड हॉटेल परिसरात उभारण्यात आलेल्या पादचारी पुलावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.

वाहनचालकांना दिशेचे मार्गदर्शन व्हावे, या हेतूने लावण्यात आलेल्या या फलकांवर काही राजकीय पक्षांच्या पुढऱ्यांचे हौशी कार्यकर्ते विना परवानगी फलक बाजी करत आहेत. त्यामुळे दिशा दर्शक फलक दिसेनासे होत असल्याने दिशेचे योग्य मार्गदर्शन होत नसलेल्या वाहनचालकांना या भागात छोट्या मोठ्या अपघातांचा सामाना करावा लागत आहे. भविष्यात या भागात एखादा मोठा आपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Navi Mumbai

Navi Mumbai

राजकीय पक्षांचे अनधिकृत कार्यालय

राज्य भरात वाहतूक करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कळंबोली मॅक्डोनाल्ड या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचे महत्व ओळखून काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी कंटेनरमध्ये अनधिकृत कार्यालय स्थापण्याचा प्रयत्न केला. इतर वेळी लहान मोठ्या अतिक्रमनांविरोधात कारवाई करणाऱ्या प्रशासकीय विभागाकडून राजकीय पक्षांकडून या अतिक्रमनाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

प्रभाग अधिकारी काय म्हणाले ?

पनवेल मनपा हद्दीत अनधिकृत फलकांवर नेहमीच वेळोवेळी कारवाई करण्यात येत असते. एकदा कारवाई केली की मोकळ्या जागेवर लगेच कुणीतरी येऊन बॅनर तसेच फलक लावण्यात येत असल्याने फळकबाजी आणि जाहिरातबाजी दिसून येत आहे. यावरही आम्ही कारवाई करु, असं प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी सांगितलं.

Political Banner And Advertisement On Direction Viewer Ward Officer Gave Assurance For Action

संबंधित बातम्या :

मुंबई ते नवी मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी Good News! लवकरच सुरू होणार जलवाहतूक

नवी मुंबई महापालिका प्रारुप मतदार याद्यांमधे नावांची हेराफेरी, आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

नवी मुंबईत वॉर्ड आहेत एकशे अकरा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा करायचा आहे बकरा; आठवलेंची कवितेतून टोलेबाजी

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.