नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांत 9 मार्च रोजी पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यामार्फत 100/22KV सब स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत काही भागातील पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. 09 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यामार्फत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील 100/22KV सब स्टेशनच्या देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Water Supply Will Be Closed On March 9 In These Areas Of Navi Mumbai Municipal Corporation)
त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांत मंगळवार 09 मार्च रोजी पाणीपुरवठा संध्याकाळी होणार नाही. तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोडमधील पाणी पुरवठा देखील बंद राहील. तसेच बुधवार 10 मार्च रोजी कमी वेळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करून नवी मुंबई महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आलेय.
दुसरीकडे नवी मुंबईत महिलांसाठी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेय. या केंद्रावर सर्व महिला कर्मचारी आहेत. तसेच महिलांकडूनच महिलांना लस दिली जात आहे. या लसीकरण केंद्रातही महिलांनाही प्राधान्य दिले जात आहे. पुरुषांनाही या केंद्रावर लस घेता येणार आहे.
तर दुसरीकडे नवी मुंबई महानगरपालिकेकडून चार महिला विशेष कोव्हिड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार ही केंद्र सुरु करण्यात आली आहेत. यात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदिरानगर तुर्भे अंतर्गत शाळा क्र. 25, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, चिंचपाडा ऐरोली मार्फत नमुंमपा शाळा क्र.53, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खैरणे मार्फत नमुंमपा सीबीएसई शाळा सेक्टर 11 कोपरखैरणे येथे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशीगाव, सेक्टर २, वाशी या चार लसीकरण केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
International Women’s Day 2021 | जगात महिलांचे स्थान उल्लेखनीय, गुगलकडून नारीशक्तीचा अनोखा सन्मान