VIDEO : नवनीत राणांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका, रवी राणांनी वाजवली ढोलकी, मेळघाटात होळीचा उत्साह

VIDEO : नवनीत राणांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका, रवी राणांनी वाजवली ढोलकी, मेळघाटात होळीचा उत्साह
Navneet Rana
Image Credit source: TV9

राज्यात ठिकठिकाणी काल होळीचा उत्साह होता. पारंपरिक पद्धतीनं अनेक ठिकाणी होळी साजरी करण्यात आली. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यानेही काल होळीचा उत्साह साजरा केला. कोणताही उत्साहाचा क्षण असला की नवनीत राणा त्यात सहभागी होताच. मेळघाटात होळीचा उत्साह असताना रवी राणा यांनी ढोलकी वाजवली तर नवनीत राणा यांनी आदिवासी नेतृत्यावर ठेका धरला. यावेळी राणा दाम्पत्याचा उत्साह पाहून उपस्थितांनीही त्यांचं कौतुक केलं.

सुरेंद्रकुमार आकोडे

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 18, 2022 | 8:20 AM

अमरावती : राज्यात ठिकठिकाणी काल होळीचा उत्साह होता. पारंपरिक पद्धतीनं अनेक ठिकाणी होळी (Holi) साजरी करण्यात आली. तर आज धुलिवंदन साजरा करण्यात येतोय. खासदार नवनीत राणा (Navneet Rana)आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) या दाम्पत्यानेही काल होळीचा उत्साह साजरा केला. यावेळी राणा दाम्पत्याने मेळघाटात होळीचा उत्साह साजरा केला. विशेष म्हणजे आदिवासी बांधवांसोबत राणा दाम्पत्याने होळी सण साजरा केलाय. आता इतक्या उत्साहाच्या वातावरणात शांत बसणार त्या नवनीत राणा कसल्या. कोणताही उत्साहाचा क्षण असला की नवनीत राणा त्यामध्ये सहभागी होताच. यापूर्वी देखील त्यांनी अनेकदा नृत्यावर ठेका धरलाय. मेळघाटात होळीचा उत्साह असताना रवी राणा यांनी ढोलकी वाजवली तर नवनीत राणा यांनी आदिवासी नेतृत्यावर ठेका धरला. यावेळी राणा दाम्पत्याचा उत्साह पाहून उपस्थितांनीही त्यांचं कौतुक केलं.

मेळघाटात होळीचा उत्साह

मेळघाटात आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करतात.  यावेळी ते आदिवासी नृत्यही करतात. मेळघाटासह राज्यातील विविध भागात होळीचा उत्साह असतो. मेळघाटात राणा दाम्पत्याने आदिवासी नृत्यावर धरलेला ठेका सध्या चांगलाच चर्चेत आहे. विशेष म्हणजे आदिवासी बांधवांसोबत राणा दाम्पत्याने होळी सण साजरा केला.

अन् त्यावेळीही त्यांना मोह आवरला नाही!

यापूर्वी देखील एका खो-खो स्पर्धेमध्ये नवनीत राणा यांनी सहभाग घेतला होता.  या स्पर्धेच्या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून खासदार नवनीत राणा यांना आमंत्रित करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर महिला खो-खो खेळत होत्या. यावेळी शांत बसणार त्या नवनीत राणा कसल्या. यावेळी खासदार नवनीत राणांना खो-खो खेळण्याचा मोह आवरला नाही. लागलीच त्यांनी पदर खोचला आणि खो-खो स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी स्पर्धेत सुसाट धावत आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानी खेळातून आपली कसब दाखवत प्रथम पारितोषिक देखील पटकावले. खासदार नवनीत राणांचा खो-खो स्पर्धेतील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होतो.

त्यावेळी भाकरीचीही चर्चा

एकदा नवनीत राणा यांनी त्यांच्याच मतदारसंघातील अंजनगाव बारी इथं शेतातील घरात मुक्कामी होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबातील लोकांना आणि मुलाबाळांना स्वत:च्या हाताने घरातील चुलीवर भाकरी थापून आणि पोळ्या करुन खाऊ घातल्या होत्या. भाकरी थापताना आणि पोळ्या करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ त्यावेळी सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. राणांच्या या व्हिडीओला चांगलीच पसंती मिळाली होती. त्यावेळी देखील राणा यांची चांगलीच चर्चा झाली होती.

इतर बातम्या

Pune | पुणे – मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा ; 22 मार्चपासून सुरु होणार रेल्वे मासिक पास

मुंबईत मस्करीची कुस्करी, होळीला रंगांचा फुगा मारला, बाईकचा धक्का लागून सायकलस्वार तरुणाचा मृत्यू

Hurun Global Rich List 2022 : मुकेश अंबानींचा जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश, अदानींच्या संपत्तीत विक्रमी वाढ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें