‘अफजल खानाचा कोथळा काढण्यासाठी गेलेले उद्धव ठाकरे ढोकळा खाऊन आले’

नाशिक : अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी गेलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ढोकळा खाऊन परत आले. मग हे वाघ आहेत का बिननखाचे वाघ? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या नाशिक येथील प्रचारसभेला आले होते. भुजबळ यांच्याविरोधात भाजप-शिवसेना युतीकडून हेमंत गोडसे यांना …

‘अफजल खानाचा कोथळा काढण्यासाठी गेलेले उद्धव ठाकरे ढोकळा खाऊन आले’

नाशिक : अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी गेलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ढोकळा खाऊन परत आले. मग हे वाघ आहेत का बिननखाचे वाघ? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या नाशिक येथील प्रचारसभेला आले होते. भुजबळ यांच्याविरोधात भाजप-शिवसेना युतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नवाब मलिक म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाने मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली, तेव्हा अनेकजण मोदींचे कौतुक करत मोदी मोदी असा नारा देत होते. मात्र, आता कोणीच काही बोलत नाही. बी. एस. एन. एल.च्या कर्मचाऱ्यांचा पगार अजून दिलेला नाही. रेल्वे विभाग जिओ टेलिफोन खरेदी करत आहे. यावरुन हे सरकार कोण चालवत आहे हे स्पष्ट होते. मोदी, शहा आणि अंबानी हेच सरकार चालवत आहे.’

‘वाघाची बकरी झाली’

‘पहिले मंदिर, फिर सरकार’ बोलणारे उद्धव ठाकरे अमित शाहांपुढे झुकले. वाघाची बकरी झाली, अशी म्हणत मलिक यांनी ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांवर सडकून टीका केली. तसेच या सरकारच्या सर्व घोषणा फोल ठरल्याचाही आरोप त्यांनी केला.

‘शापाने काही होत असेल तर हाफिज सईद आणि अझहर मसूद यांना दे’

बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा सिंग तिच्या शापाने करकरेंचा मृत्यू झाला असे सांगते. एका शहीद अधिकाऱ्याला असे बोलणे लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रज्ञा सिंगला भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली. म्हणजे भाजप दहशतवादाबरोबर आहे. खरच ठाकुरच्या शापाने काही होत असेल तर हाफिज सईद आणि अझहर मसूद यांना शाप दे. देशातील वाईट प्रवृत्तींना शाप दे, असेही मलिक यांनी सांगितले. यावेळी मलिक यांनी प्रज्ञा ठाकुर साध्वी नाही, तर हत्यारी असल्याचीही घणाघाती टीका केली.

‘सुब्रह्मण्यम स्वामींच्या मुलीची आणि आडवाणींच्या भाचीची घरवापसी कधी करणार?’

लवजिहादच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सुब्रह्मण्यम स्वामी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘मुसलमान लवजिहाद करत असतील, तर सुब्रह्मण्यम स्वामींची मुलगी मुस्लिमांच्या घरी आहे. तिला घरी परत कधी आणणार? अडवाणींची भाची मुस्लिमांच्या घरी आहे तिला परत कधी आणणार?’

राजस्थानमध्ये दलितांवर गोळी पोलिसांनी नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RRS) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चालवल्याचाही आरोप मलिक यांनी केला.

दरम्यान, नाशिकसाठी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान होईल. या दिवशी नाशिकसह राज्यात 17 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *