Maharashtra Lockdown: आम्ही लोकांची काळजी घेऊ, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही: नवाब मलिक

जे काही भाजपचे लोक पैसे द्या, पैसे टाका, सांगत आहेत ते योग्य नाही | Maharashtra Lockdown Nawab Malik

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:39 PM, 12 Apr 2021
Maharashtra Lockdown: आम्ही लोकांची काळजी घेऊ, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही: नवाब मलिक
nawab malik

मुंबई: गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन (Lockdown) करताना कोणाला विचारात घेतले नाही. कोणाच्या खात्यात पैसे जमा करण्याचा कार्यक्रम केला नव्हता. त्यामुळे आता नुसत्या राजकारणासाठी भाजपने (BJP) महाराष्ट्रात आर्थिक पॅकेजचा मुद्दा लावून धरणे योग्य नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. (NCP leader Nawab Malik slams BJP over politics of Maharashtra Lockdown)

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रात अर्थव्यवस्था एकदम ठप्प झाली पाहिजे ही परिस्थिती न करता काय काय सुरु ठेवता येईल किंवा कुणाकुणाला काय मदत करता येईल याबाबत आजपर्यंत चर्चा होऊन निर्णय होईल. परंतु जे काही भाजपचे लोक पैसे द्या, पैसे टाका, सांगत आहेत ते योग्य नाही असे नवाब मलिक यांनी म्हटले. राज्यातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचे आहे ते निश्चितपणे सरकार करेल, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

‘आम्ही लोकांची काळजी घेऊ, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही’

आम्ही आमच्या लोकांची काळजी घेऊ, कुणालाही वार्‍यावर सोडणार नाही ही आमची प्राथमिकता आहे असे सांगतानाच भाजपशासित राज्यामध्ये काय चालले आहे याकडे केंद्राने लक्ष द्यावे असा सल्ला भाजपच्या नेत्यांना नवाब मलिक यांनी दिला आहे.

केंद्र सरकार ज्या काही सूचना देत आहे त्याची तंतोतंत अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. ज्या जिल्हयात टेस्टींगच्या क्षमता कमी आहेत तिथे मशीन खरेदी करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र काही राज्यात अँटीजेनच्या आधारावर आकडे दाखवले जात असल्याची वस्तुस्थिती नवाब मलिक यांनी मांडली.

आपल्या राज्यात 80 टक्के आरटीपीसीआर टेस्ट होतात. प्रत्येक जिल्हयात आरटीपीसीआर करण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. आम्ही केंद्राच्या सूचनांचे तंतोतंत पालन करतोय आणि त्याची अंमलबजावणीही करु परंतु केंद्रसरकारने पश्चिमबंगाल, बिहार, गुजरात, उत्तरप्रदेश यांनाही सूचना द्याव्यात असेही नवाब मलिक म्हणाले.

संबंधित बातम्या:

Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन?

‘केंद्राकडून राज्याचा अपमान, भाजपने विरोध करावा, अन्यथा महाराष्ट्रात राजकारणाचा अधिकार नाही’

(NCP leader Nawab Malik slams BJP over politics of Maharashtra Lockdown)