राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडवणारा कैदी तिहार तुरुंगात, मोदींचा गौप्यस्फोट

गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातल्या दुसऱ्याही सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, त्याच्याशी संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवार तरी सहमत आहेत का? तुम्ही शिवरायांच्या भूमीत जन्म घेतलाय, गप्प राहू नका, असं आवाहन करत मोदींनी शरद पवारांना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देण्याचं आवाहन केलं. शिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांची […]

राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडवणारा कैदी तिहार तुरुंगात, मोदींचा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातल्या दुसऱ्याही सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, त्याच्याशी संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवार तरी सहमत आहेत का? तुम्ही शिवरायांच्या भूमीत जन्म घेतलाय, गप्प राहू नका, असं आवाहन करत मोदींनी शरद पवारांना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देण्याचं आवाहन केलं. शिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांची सध्या झोप उडालेली आहे, असा गौप्यस्फोट मोदींनी केला.

राष्ट्रवादीवर टीका करताना मोदी म्हणाले, “राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप का उडालीय? त्यांची झोप उडवणारा व्यक्ती दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद आहे. तो काही बोलेल का या भीतीने त्यांची झोप उडाली आहे,” असं म्हणत मोदींनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला. दरम्यान, भाजपकडून फक्त घाबरवण्याचं काम केलं जात आहे, पण कुणीही घाबरणार नाही, असं उत्तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.

कोण आहे तिहार तुरुंगात?

सगळ्याच गोष्टी आत्ता सांगणार नाहीत, असं म्हणत मोदींनी सस्पेन्स कायम ठेवलाय. त्यामुळे तिहारमध्ये राष्ट्रवादीची झोप उडवणारा कैदी नेमका कोण आहे याबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे. पहिलं नाव म्हणजे ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील आरोप ख्रिश्चन मिशेल सध्या तिहार जेलमध्ये आहे. त्याची सध्या चौकशी सुरु आहे. शिवाय अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनही तिहार तुरुंगात बंद आहे. ही दोन मोठी नावं आहेत, जी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. पण याव्यतिरिक्तही कुणी आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

काँग्रेसचा जाहीरनामा हे पाकिस्तानचं वचनपत्र : मोदी

काँग्रेसचा जाहीरनामा हा पाकिस्तानचं योजनापत्र आहे, काँग्रेसचा जाहीरनामा जवानांचं मनोबल कमी करणारा आहे. या महामिलावट करणारांना थोडीही संधी मिळाली तर नक्षल आणि दहशतवादी आंदोलनांना आणखी गती मिळेल. कुणी देशद्रोह केला तरी त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल होणार नाही हे काँग्रेसने जाहीर केलंय, यामुळे देशाची परिस्थिती काय होईल? देशाचे संरक्षण मंत्री राहिलेल्या शरद पवारांना विचारायचंय, तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी सहमत आहात का? तुमचा जन्म शिवरायांच्या भूमीत झालाय, गप्प का बसता? असा सवालही मोदींनी केला.

VIDEO पाहा, मोदी राष्ट्रवादीवर नेमकं काय म्हणाले?

Non Stop LIVE Update
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.