पंढरपूरची पोटनिवडणूक पुन्हा घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवारी (2 मे) पार पडली. (NCP demand re-election of Pandharpur-Mangalvedha by-election)

पंढरपूरची पोटनिवडणूक पुन्हा घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
भागीरथ भालके VS समाधान औताडे
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 7:36 AM

मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur mangalwedha bypoll result)  साम-दाम-दंड-भेद वापर करण्यात आला. त्यामुळे याची योग्य ती चौकशी करुन फेरनिवडणूक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलने केली आहे. नुकतंच त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लीगल सेलचे अॅड नितीन माने यांनी याबाबतची मागणी केली आहे. (NCP Legal Cell Wrote Letter on re-election of Pandharpur-Mangalvedha by-election)

राष्ट्रवादीच्या लीगल सेलच्या पत्रात काय? 

विधानपरिषद विद्यमान आमदार प्रशांत परिचारक आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या कारखान्यावर कार्यरत असणारे सर्व सभासद, कर्मचारी यांना निवडणुकीपूर्वी तीन दिवस डांबून ठेवले होते. तसेच त्यांना धमकी देऊन भाजपला मतदान करा, अन्यथा कामावरुन काढून टाकू, असेही सांगण्यात आले. त्यामुळे धमक्या देण्याचा संशय निर्माण होत असून, त्या संदर्भातील काही मागण्या..

  1. प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे या दोन्ही कारखानाच्या तसेच कार्यालयाच्या आणि घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे.
  2. दोघांच्या फोन रेकॉर्डिंग तपासावे.
  3. समाधान आवताडे यांच्या कंट्रक्शन कंपनीचा पूर्ण ऑडिटचा तपास करण्यात यावा.
  4. निवडणुकीच्या दरम्यान दोन्ही सदस्यांच्या प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे हे संचालक असणाऱ्या सर्व संस्था, कारखान्यातील आणि कंट्रक्शन कंपनीच्या सर्व बँक खात्यांची चौकशी करण्यात यावी.
  5. माझे न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या निवडणुकीची चौकशी करण्यात यावी.
  6. समितीच्या अध्यक्षतेखाली फेरनिवडणूक पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलने पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक फेरनिवडणूक घेण्याबाबत सहा विविध मागण्या केल्या आहेत. याबाबत त्यांनी मुख्य निवडणूक आयोगासह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, सोलापूर जिल्हाधिकारी, पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही पत्र पाठवलं आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur mangalwedha bypoll result) भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे (Samadhan Autade win) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवारी (2 मे) पार पडली.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी बाजी मारली. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना एकूण 1 लाख 09 हजार 450 मत मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 1 लाख 05 हजार 717 मत मिळाली. अवघ्या 3733 मतांनी समाधान आवताडे विजयी झाले.

?भाजप : समाधान आवताडे : 109450 विजयी  ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 105717 पराभूत

(NCP Legal Cell Letter Election Commission re-election of Pandharpur-Mangalvedha by-election)

संबंधित बातम्या : 

“भारतनाना माफ करा, सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली”

‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, पण..’, पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

“अजित पवारांना गर्व झाला होता, तो मोडून काढला”; पंढरपूर मंगळवेढ्याच्या विजयानंतर गोपीचंद पडळकरांची खोचक टीका

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.