VIDEO : हमें तुमसे प्यार कितना.... उदयनराजेंचा लाईव्ह परफॉर्मन्स

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या रोखठोक आणि तितक्याच मनमोकळ्या स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. पोटात एक आणि ओठात एक, या उक्तीला खोटं ठरवणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे उदयनराजे. जे आहे ते बिनधास्त बोलून मोकळं व्हायचं, मग इतर कोण काय बोलतील, याकडे आपण लक्ष द्यायचं नाही, हे उदयनराजे भोसले नेहमी सांगतात. याचाच प्रत्यय सातारा नगरपालिकेच्या …

VIDEO : हमें तुमसे प्यार कितना.... उदयनराजेंचा लाईव्ह परफॉर्मन्स

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या रोखठोक आणि तितक्याच मनमोकळ्या स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. पोटात एक आणि ओठात एक, या उक्तीला खोटं ठरवणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे उदयनराजे. जे आहे ते बिनधास्त बोलून मोकळं व्हायचं, मग इतर कोण काय बोलतील, याकडे आपण लक्ष द्यायचं नाही, हे उदयनराजे भोसले नेहमी सांगतात. याचाच प्रत्यय सातारा नगरपालिकेच्या कार्यक्रमात आला. खासदार उदयनराजे भोसलेंनी खास गाणं गाऊन उपस्थितांची मनं जिंकली.

सातारा नगरापालिकेच्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी हिंदी गाणं गाऊन उपस्थितांना खुश केलं. ‘कुदरत’ सिनेमातील किशोर कुमार यांनी गायलेलं ‘हमें तुम से प्यार कितना, ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना, हमें तुम से प्यार…’ हे गाणं उदयनराजे भोसले यांनी गायलं. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून उदयनराजेंना प्रतिसाद दिला. मात्र, आपला गळा खराब असल्याने नीट गाता येत नसल्याची प्रांजल कबुलीही उदयनराजेंनी दिली.

सातारा नगरपालिकेच्या वतीने जिल्ह्यातील नामांकित कला, क्रीडा, सांस्कृतिक व्यक्तींचा पुरस्कार सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शाहू कलामंदिर येथे पार पडला.

VIDEO : उदयनराजेंचा लाईव्ह परफॉर्मन्स :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *