उस्मानाबादः शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे सध्या सर्व राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्यानिमित्ताने अनेक नेत्यांचे दौरे आता विविध भागात सुरु आहेत. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी उस्मानाबादचाही दौरा केला आहे. त्यावेळी त्यांनी बोलताना सध्याच्या सरकारवर जोरदार टीका करत हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे सांगत आपल्या विचारांचे सरकार लवकरच येईल असा विश्वासही यावेळी त्यानी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी शिंदे आणि फडणवीस सरकार हे जास्त काळ राहणार नसल्याची टीका करत शिंदे गटावर त्यांनी अपात्रतेचा आरोप करत त्यामुळेच हे सरकार पडणार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
ज्या दिवशी या सरकारवर अपात्रतेची कारवाई होईल त्या दिवशी हे सरकार पडणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिंदे-फडणवीस सरकारच्या डोक्यावर अपात्रेची टांगती तलवार आहे.
त्यामुळेच हे सरकार कधी कोसळेल हे सांगता येणार नाही असं म्हणत त्यांनी या सरकारला अपात्रतेचा शिक्का मारला आहे. राज्यात ज्या सरकारचे काम सुरु आहे, त्या सरकारचे काम म्हणजे 20-20 मॅचसारखं काम सुरु आहे.
दिसेल त्याला हो म्हणून काम करत असल्याची ठपकाही त्यांनी त्यांच्यावर ठेवला आहे.सध्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका लागल्या असल्याने सर्व राजकीय पक्षांनकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यामुळे आजही जयंत पाटील यांनी या सरकारला अपात्र ठरवत या सरकारचे काही खरे नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेचे आमदार फुटले त्यामुळे त्याकाली सरकार कोसळले होते. त्यामुळे या शिंदे गटातील आमदारांवर जर अपात्रतेची कारवाई झाली तर हेही सरकार कधीही कोसळेल असा टोला लगावत जयंत पाटील यांनी आपल्या विचारांचे सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.