'घाटी'चा गलथान कारभार, स्ट्रेचर नसल्याने लिफ्टबाहेर प्रसूती, खाली पडून बाळ दगावलं!

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. स्ट्रेचर न मिळाल्यामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी घाटी प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे. नेमकी घटना काय आहे? औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात असलेल्या सोनाली खटमोडे या गर्भवतीला आपल्या नवजात शिशूला गमवावं लागलं. सोनालीला …

'घाटी'चा गलथान कारभार, स्ट्रेचर नसल्याने लिफ्टबाहेर प्रसूती, खाली पडून बाळ दगावलं!

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. स्ट्रेचर न मिळाल्यामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी घाटी प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे.

नेमकी घटना काय आहे?

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात असलेल्या सोनाली खटमोडे या गर्भवतीला आपल्या नवजात शिशूला गमवावं लागलं. सोनालीला रात्री एक वाजण्याच्या सुमारास प्रसूतीकळा सुरु झाल्या. छावणीत माहेरी बाळंतपण करण्यासाठी ती आलेली होती. आई आणि पतीसह ती घाटी रुग्णालयात आली. स्ट्रेचर नसल्याने लिफ्टपर्यंत तिघेही चालत आले. लिफ्टच्या दरवाज्यापर्यंत पोहचल्यावर ती महिला बाहेरच तिची प्रसूती झाली आणि बाळ खाली पडले. पडताक्षणी बाळ दगावले. सोनालीच्या कुटुंबीयांनी आरडओरड केल्यावर तेथील लोकांनी महिलेला मदत करत उपचारासाठी दाखल केले.

सोनाली खटमोडे ही तिच्यासोबत जालन्याला तिच्या पतीसोबत रहाते. तिला पहिली दोन मुलं आहेत. तिसरं आपत्य होतं, मात्र त्याचा चेहरा देखील ये मातेला पाहता आला नाही. या प्रकरणी आता घाटी प्रशासनाने समिती स्थापन करून चौकशी सुरु केल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे.

घाटी रुग्णालयात ही एकच घटना नाही, तर अशा काही घटना अनेक वेळा घडतात. मात्र, तक्रार दिल्यावर त्यावर योग्य उत्तर मिळत नसल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांची आहे.

घाटी रुग्णालयात औरंगाबादसह आसपासच्या परिसरातील जिल्ह्यातून गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. काही दिवसांपूर्वी रुग्णांना मोफत औषध मिळत नसल्याची तक्रार होती त्यात आता रुग्णसेवा देखील मिळत नसल्याचं समोर येत असल्याने सरकारी दवाखाने रुग्णांचे उपचार करण्यासाठी आहेत का हा प्रश्न उपस्थित झालाय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *