Shivjayanti Gov Rules: तिथीनुसार शिवजयंती साजरी करताय? नक्की करा, पण आधी सरकारच्या या नियम, अटी बघितल्यात का?

आज तिथिनुसार शिवजंयती (ShivJayanti)  आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जंयती ही तारीख आणि तिथी अशा दोनही प्रकारे साजरी केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Shivjayanti Gov Rules: तिथीनुसार शिवजयंती साजरी करताय? नक्की करा, पण आधी  सरकारच्या या नियम, अटी बघितल्यात का?
छत्रपती शिवाजी महाराज
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 7:38 AM

मुंबई : आज तिथिनुसार शिवजंयती (ShivJayanti)  आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जंयती ही तारीख आणि तिथी अशा दोनही प्रकारे साजरी केली जाते. देशासह राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे (Corona) सावट आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन गेले दोन वर्ष प्रत्येक सनोत्सवांवर राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून निर्बंध घालण्यात आले होते. मात्र काही दिवसांपासून कोरोनाच प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंधांमध्ये राज्य सरकारच्या वतीने काहीप्रमाणात सूट देण्यात आली होती. परंतु तरी देखील प्रत्येक उत्सवासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येतात. आज तिथिनुसार शिवजंयती आहे. राज्याचे अराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयती दिवशी राज्यात मोठा उत्साह असते. परंतु गर्दी झाल्यास पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढू शकतो, त्यामुळेच शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहविभागाकडून नवीन मार्गदर्शक सूचना असलेले परिपत्रक काढण्यात आले आहे.

काय आहेत सूचना ?

या परिपत्रकात असे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या वर्षी सोमवार दिनांक 21 मार्च 2022 रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. परंतु कोरोनाचे संक्रमण अद्यापही सुरूच असल्यामुळे तिथिनुसार येणारी शिवजयंती ही नागरिकांनी आपल्या आरोग्यची काळजी घेऊन कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरी करावी यासाठी काही मार्गदर्शक सूचना देत आहोत. या परिपत्रकात शिवजयंतीच्या अनुषंगाने स्पष्ट अशा सूचना देण्यात आलेल्या नाहीत. मात्र महाराष्ट्र शासन महसूल व अपत्ती व्यवस्थापन विभागाने दिनांक एक मार्च रोजी कोरोनासंदर्भांत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून शिवजयंती साजरी करावी असे म्हटले आहे.

शासनाच्या आदेशानुसार पुढील नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे

  1. कोविड -19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे.
  2. कोविड -19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता गर्दी टाळून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
  3. शिवजयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. त्याऐवजी केबल नेटवर्क किंवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
  4. प्रभात फेरी, बाईक रॅली किवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी.
  5. शिवजयंतीनिमित्त आरोग्यविषयक उपक्रम किंवा शिबिरे (रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजारांच्या उपायांबाबत जनजागृती करावी. आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित करताना सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाचे नियम पाळावे.
  6. कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
  7. शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होताना मास्कचा वापर करावा
Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.