मुख्यमंत्री म्हणाले पुढचे 24 तास धोक्याचे, महापालिकेचीही पाठराखण

मुंबईत नालेसफाई झाली नाही असं म्हणता येणार नाही, पावसाचं प्रमाण अत्यंत जास्त आहे, त्यामुळे नाले दुथडी भरुन वाहत आहेत. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पालिकेची पाठराखणही केली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले पुढचे 24 तास धोक्याचे, महापालिकेचीही पाठराखण

मुंबई : मुंबई, ठाणे, पालघर परिसराला आज पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले. मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या आप्तकालीन विभागाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी “मुंबईत गेल्या 4 चार दिवसा अतिवृष्टी झाली. महिनाभराचा पाऊस 4 दिवसात झाला. येत्या 3-4 दिवसात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांनी सतर्कता बाळगावी” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.  तसेच आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.  मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाख तर महापालिकेकडून 5 लाख देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

गेल्या पाच दिवसांपासून सततच्या पावसामुळे मुंबई-ठाणे-पालघर परिसराला झोडपून काढले आहे. हा मुसळधार पाऊस अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे. मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 75 जण जखमी झाले आहे. तर कल्याणमध्ये भिंत कोसळून 3 तर पुण्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात घडलेल्या या सर्व घटना गंभीर आहेत. भिंतीच्या आजूबाजूला पाणी साठल्याने ती भिंत कोसळली. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.”

मुंबई, ठाणे, पालघर परिसराला आज पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले. मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या आप्तकालिन कक्षाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी “मुंबईत नालेसफाई झाली नाही असं म्हणता येणार नाही, पण पावसाचं प्रमाण अत्यंत जास्त आहे, त्यामुळे नाले दुथडी भरून वाहत आहे. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पालिकेची पाठराखणही केली.”

मुंबईत सततच्या पावसामुळे आज (2 जुलै) मुंबई-ठाणे-पालघर परिसराला झोडपून काढले आहे. काल (1 जुलै) मुंबईसह ठाणे परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. दरम्यान आज (2 जुलै)  मुंबईतील किंग्ज सर्कल, साकीनाका, घाटकोपर, धारावी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, सायन, कुर्ला, विक्रोळीसह अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि घरात पाणी भरल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. रेल्वे रुळांवरही पाणी भरल्याने मुंबईची लाइफलाइन असलेली रेल्वेही ठप्प झाली आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी येत्या 3-4 दिवस कुलाबा वेधशाळेने मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. तसेच आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणी उपसण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

नालेसफाई झाली नाही असं म्हणता येणार नाही, पावसाचं प्रमाण अत्यंत जास्त आहे, त्यामुळे नाले दुथडी भरुन वाहत आहेत. मुंबईत गेल्या चार दिवसात 300 ते 400 मिमी पाऊस झाला आहे, असे म्हणंत महापालिकेची पाठराखण केली. तसेच आजही अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी तुंबले आहे. त्यामुळे मुंबईत मध्य रेल्वे ठप्प झाली असून पश्चिम रेल्वे ही धिम्या गतीने सुरु आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच आज 11.52 मिनिटांनी हायटाईड असल्याने मुंबईत आणखी पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून शाळांनी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 22 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे खबरदारी घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे.

दरम्यान महापौरांनी कालच मुंबईत कुठेही पाणी तुंबल नाही असे सांगितले होतं. मात्र त्यावर उत्तर देताना पाणी तुंबलंय की नाही याच्या राजकारणात न जाता, मुंबईकरांना तातडीने दिलासा कसा देता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *