पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल : सुधीर मुनगंटीवार

राज्यात भाजपचे 41 खासदार असल्याने पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे सूचक वक्तव्य वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल : सुधीर मुनगंटीवार

नाशिक : राज्यात युतीचे 41 खासदार असल्याने पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे सूचक वक्तव्य वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. तसेच भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि भाजपचाच मुख्यमंत्री होण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करण्याचे आदेश दिल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

शिवसेनेच्या नाराजीविषयी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शिवसेनेची कोणतीही नाराजी नाही. मिले सूर मेरा तुम्हारा, ये दोस्ती हम नही तोडेंगे, असे म्हणत आम्ही काम करू आणि करत आहोत. भाजपचाच मुख्यमंत्री होईल यात शंका नाही.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने काका-पुतण्याचे एकमत व्हावे ही इच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त काका-पुतण्याचे एकमत व्हावे ही इच्छा आहे. त्यामुळे लोकशाहीत मदत होईल. राष्ट्रवादी काँग्रेसला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. राष्ट्रवादीने आम्ही चुकलो तेव्हा वेळोवेळी अभ्यासपूर्ण टीका केली आहे. त्यांनी यापुढे 25 वर्षे अशीच अभ्यासपूर्ण टीका करावी, असाही उपरोधिक टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *