नितीन गडकरींची मोठी घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ 7 जिल्ह्यांमधील रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यामधील रस्त्यांसाठी कोट्यावधींच्या निधीची घोषणा केलीय.

नितीन गडकरींची मोठी घोषणा, महाराष्ट्रातील 'या' 7 जिल्ह्यांमधील रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी


नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यामधील रस्त्यांसाठी कोट्यावधींच्या निधीची घोषणा केलीय. यात राज्यातील अनेक रस्त्यांच्या दुरुस्ती, रुंदीकरणाच्या कामाचाही समावेश आहे. या कामासाठी मोठा निधी मंजूर झाल्यामुळे विविध जिल्ह्यांमधील रस्ते प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे (Nitin Gadkari announce crores of Fund to 7 district of Maharashtra for road repairing).

महाराष्ट्रातील कोणत्या 7 जिल्ह्यांचा समावेश?

नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील ज्या 7 जिल्ह्यांमधील रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर केलाय त्यात नाशिक, पुणे, वाशिम, सोलापूर, सिंधुदुर्ग, रायगड आणि लातूरचा समावेश आहे. नितीन गडकरी यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याने या जिल्ह्यांमधील अनेक रस्त्यांची दुरुस्ती, दुपदरीकरणाच्या कामाला वेग येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील वाहतूक अधिक वेगवान होईल.

कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी?

पुणे

पुणे जिल्ह्यात चंबळी – कोडीत – नारायणपूर – बहिरवाडी – काळदारी (ता. पुरंदर ) रस्ते दुरुस्ती आणि डांबरीकरणासाठी 4.91 कोटी रुपये मंजूर झालेत. महाड – मधेघाट – वेल्हे – नासरापूर ते चेलाडी फाटा (ता. वेल्हे) एसएच -106 च्या रस्ते दुरुस्तीसाठी 4.81 कोटी रुपये मंजूर झालेत. वडगाव काशिंम्बेग (ता. आंबेगाव) येथे मुख्य पुलाच्या बांधकामासाठी 7.21 कोटी मंजूर झालेत. बारामती – जलोची – कान्हेरी – लकडी – कळस – लोणी – देवकर (तालुका इंदापूर) रस्ते दुरुस्तीसाठी 4.91 कोटी मंजूर झालेत.

उरण – पनवेल – भीमाशंकर – वाडा – खेड – पाबल – शिरूर (ता. खेड) रस्ते दुरुस्तीसाठी 3.91 कोटी रुपये, मुंबई-पुणे (ता. मावळ) रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी 3.98 कोटी, कारेगाव – कर्डे – निमोने (ता. शिरूर) रस्ते दुरुस्तीसाठी 3.93 कोटी, ओतूर-ब्राह्मणवाडा (ता. जुन्नर) रस्ते दुरुस्ती व रुंदीकरणासाठी 3.90 कोटी, हडपसर – मांजरी – वाघोली (ता. हवेली) रस्त्याच्या कॉक्रिटींकरणासाठी 3.85 कोटी, केशवनगर – लोणकर – पडळ – मुंढवा (ता. हवेली) रस्ते दुरुस्तीसाठी 2.20 कोटी, सासवड – राजुरी – सुपा (ता. बारामती) रस्ते दुरुस्तीसाठी 4.91 कोटी, वरकुटे (खु.) – वडापुरी – गलांडे वाडी – सरदेवाडी (ता. इंदापूर) रस्ते दुरुस्तीसाठी 4.91 कोटी रुपये मंजूर झालेत.

याशिवाय वाडा (ता. खेड) ते घोडा (ता. आंबेगाव) रस्ता दुरुस्तीसाठी 2.72 कोटी (ता. आंबेगाव), दौंड (जि. पुणे) ते गर (जि. नगर) भीमा नदीवरील पुलाचे कामासाठी 19.99 कोटी आणि निमगाव खंडोबा येथे सर्व सुविधांसह एरियल रोप-वे कामासाठी 31.81 कोटी मंजूर झालेत.

नाशिक

 • भगूर-लहावित-मुंडेगाव रोडवरील पुलाच्या पुर्नबांधणीसाठी 2.45 कोटी मंजूर (ता. इगतपुरी)
 • नानाशी जोगमोडी रोड दुरुस्तीसाठी 3.81 कोटी मंजूर
 • मातूलथन-धामणगाव-अंदारसुल-बोकटे रस्ते दुरुस्तीसाठी 1.47 कोटी मंजूर (ता. येवला)
 • लासलगाव-वाकी रस्ते दुरुस्तीसाठी 2.45 कोटी मंजूर (ता. निफाड)
 • चिरई-बुबळी-साबरदारा-बिवल-मणी रोड दुरुस्ती आणि बांधणीसाठी 91.92 कोटी मंजूर (ता. सुरगाणा)
 • पळसण-म्हैसमळ फाटा ते बार्हे मोडलपाडा ते पेठ तालुका हद्द रस्ते दुरुस्ती आणि बांधणीसाठी 91.39 कोटी मंजूर
 • तांबडी नदीवर दलवट कोसुर्डे मुख्य पुलाच्या बांधणीसाठी 1.72 कोटी मंजूर (ता. कळवण)
 • दुबेरे-पाटोळे-गोंदे-भोकणी-फर्दापूर-धरणगाव-निमगाव-देवपूर-खडंगली-मेंढी सोमठाणे-सांगवी रस्ते दुरुस्तीसाठी 3.93 कोटी मंजूर (ता. सिन्नर)
 • कसबे सुकेणे-सय्यदपिंपरी -आडगाव रस्ते दुरुस्तीसाठी 1.96 कोटी
 • नाशिक-गंगापूर-दुगाव रस्ते दुरुस्तीसाठी 1.96 कोटी मंजूर
 • एसटीबीटी एनएच-3 ते शेरवडे वणी-वावी रस्ते दुरुस्तीसाठी 3.96 कोटी मंजूर (ता. निफाड)
 • साकुरी-पिंपर्ले-कोंढर-धनेर-खडगाव-घोटणे-मालेगाव रस्ते दुरुस्तीसाठी 4.91 कोटी मंजूर (तालुका नांदगाव)
 • वडीवऱ्हे-दहगाव-जातेगाव- महिरावणी गिरनारे रस्ते दुरुस्तीसाठी 4.87 कोटी
 • सलीयाना मालेगाव रोड एसएच. 19 काँक्रिटीकरण चौपदरी रस्ते बांधणीसाठी 5.95. कोटी मंजूर
 • अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव-राजूर-बहुला-गौलाणे-विल्होळी रस्ते दुरुस्तीसाठी 4..85 कोटी मंजूर
 • कनालद ते देवगाव रस्ते दुरुस्तीसाठी 9.82 कोटी मंजूर (तालुका निफाड)
 • जानोरी-मोहाडी-कोऱ्हाटे-दिंडोरी रस्ते दुरुस्तीसाठी 13.37 कोटी मंजूर (तहसील-दिंडोरी)
 • अहवा-ताराबाद-उमरणे-गिरणारे-दरेगाव-डोनगाव-मनमाड रस्ते दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी 4.95 कोटी मंजूर (ता.चंदवाड)

रायगड

 • आंबेत-बागमंडला रस्ता एसएच -10 दुरुस्तीसाठी 3.92 कोटी मंजूर (ता.श्रीवर्धन)
 • अलिबाग – रेवदंडा रोडवर पुलाच्या बांधकामासाठी 4.75 कोटी मंजूर
 • पळसदारी स्टेशन ते पळसदरी अवलास – मोहिली – बिड – कोंडीवाडे एमडीआर 105 कामास मंजुरी, 2.30 कोटींचा निधी
 • नालाधे – बोरिवली – अंजाप एमडीआर -107 (ता. कर्जत) 1.79 कोटी मंजूर
 • नवंशी – वधव – कलेशरी रस्ता एमडीआर -23 दुरुस्तीसाठी (ता. पेण) 4.86 कोटी मंजूर
 • उद्धार-कुंभारघर-महागाव-चंदरगाव-हातोंड-गोंडाव ते एनएच-548 (ए) रस्ता दुरुस्तासाठी (तालुका सुधागड) 6.76 कोटी मंजूर
 • एसएच -105 कोन – सावळे रोड दुरुस्तीसाठी (तालुका पनवेल) 14.65 कोटी मंजूर

सोलापूर

 • सावळेश्वर-पोफळी-अर्जुनसोंड-लांबोटी-शिरापूर रस्ता दुरुस्तीसाठी (तालुका-मोहोळ) 3.91 कोटी मंजूर
 • वणीचिंचले-भोसे रेड्डे-निंबोणी-मरावडे रस्ते दुरुस्तीसाठी (तालुका-मंगळवेढा) 3.91 कोटी मंजूर
 • शेतफळ-माढा-पापनास रस्ते दुरुस्तीसाठी (तालुका माढा) 3.91 कोटी मंजूर
 • बचेरी-शिंगोर्णी-कटफळ-अचकदानी-सोनलवाडी-येलमर्मनगेवाडी-वटांबरे-हनुअंतगाव-सोनंद घेरडी रस्ते दुरुस्तीसाठी ( ता-सांगोला) 3..45 कोटी मंजूर
 • एनए 65 मुळेगाव-धोत्री-हन्नूर-किणी-काझी-कानबास-नळदुर्ग रस्ते दुरुस्तीसाठी (ता.अक्कलकोट) 11.74 कोटी मंजूर
 • नातेपुते- लोणंद-गिरवी-इस्लामपूर-गरावद-निमगाव ते वेलापूर रस्ते दुरुस्तीसाठी (ता-माळशिरस) 9 .79 कोटी मंजूर

लातूर

 • मातेफळ-खंडाळा-गोंडेगाव-रामेगाव- एसएच (राज्य महामार्ग) 145-ढाकणी-भेटा एसएच 239 रस्त्याची दुरुस्ती (4.95 कोटींचा निधी)
 • अहमदपूर-बेलूर-एमएसएच-6 रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरण (ता.अहमदपूर जिल्हा लातूर) (3.99 कोटींचा निधी मंजूर )
 • उदगीर शहरातील नांदेड बिदर रोड- उदगीर कॉलेज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याची दुरुस्ती आणि रस्ता दुभाजक (1.97 कोटींचा निधी मंजूर)
 • अंबाजोगाई-घाटंदूर-अहमदपूर थोडगा मोघा शिंदगी रस्ताची दुरुस्ती आणि दुपदरीकरण (19.83 कोटींचा निधी मंजूर)
 • औसा-यकतपूर-कान्हेरी-जय नगर-किनीथोत-शेडोई-खरोसा मार्ग दुरुस्ती ( तालुका औसा) (3.96 कोटींचा निधी मंजूर)
 • घरणी-नळेगाव-उजेद-नितूर-लंबोटा-निलंगा-कासार-सिरशी मुळाज-तुरोरी, एनएच 9 रस्त्याची दुरुस्ती (तालुका -निलंगा) (2.98 कोटींचा निधी मंजूर)
 • चिंचोलीराव-औसा-नगरसोगा-दापेगाव-गुबाई-सतूर रस्ता, एनएच -242 रस्त्याची दुरुस्ती (तालुका औसा) (4..95 कोटींचा निधी मंजूर)
 • नितूर-शिरोई-हेरंब रोडवरील पुलाचे बांधकाम (56..7 कोटींचा निधी)
 • एसएच 211- सरसा-गडवाड-शिराळा-बोरगाव- निवळी-कोंड रस्त्याची दुरुस्ती (14.91 कोटींचा निधी मंजूर)

वाशिम

 • सोनती गोंदाला मंगुल झनक एमडीआर 24 आणि गोवर्धन पारडी बेलखेड रीठाड एमडीआर 59 (तालुका रिसोड) (4.91 कोटींचा निधी मंजूर)
 • शिरपूर-करंजी-तमाशी-वाशिम रोड दुरुस्तीसाठी 5.85 कोटींचा निधी मंजूर

सिंधुदुर्ग

 • वेंगुर्ला-अकेरी-आंबोली-बेळगाव रोड एसएच 180 दुरुस्तीसाठी 3.41 कोटी मंजूर
 • अडेली-वज्रथ-तळवडे माटोंड-अजगाव रोड दुरुस्तीसाठी 1.46 कोटी मंजूर
 • ओझर-कांदळगाव-मगवणे-मसुरे-बांडीवाडे-आडवली-भाटवाडी रोडवरील पुलांच्या बांधकामासाठी 3..82 कोटी मंजूर

हेही वाचा :

गडकरीसाहेब म्हणाले, विदर्भातील ऑक्सिजनचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा : अजित पवार

महाराष्ट्राच्या मदतीला आंध्र प्रदेश धावलं, 300 व्हेंटिलेटर्स देण्याची जगनमोहन रेड्डींची घोषणा, नितीन गडकरींची शिष्टाई यशस्वी

येत्या काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल; गडकरींना विश्वास

व्हिडीओ पाहा :

Nitin Gadkari announce crores of Fund to 7 district of Maharashtra for road repairing

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI