सुशीलकुमार आणि विलासरावांनी महाराष्ट्राचा बँड बाजा वाजवला : गडकरी

सोलापूर : “काँग्रेसने आपल्या चेले-चपट्यांची गरिबी हटवली. सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला”, असा घणाघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ते सोलापुरात बोलत होते. सोलापूरचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रचारार्थ गडकरींची जाहीर सभा झाली. यावेळी गडकरींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. आम्हाला चिंता तरुणांना रोजगार देण्याची, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या […]

सुशीलकुमार आणि विलासरावांनी महाराष्ट्राचा बँड बाजा वाजवला : गडकरी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

सोलापूर : “काँग्रेसने आपल्या चेले-चपट्यांची गरिबी हटवली. सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला”, असा घणाघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ते सोलापुरात बोलत होते. सोलापूरचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रचारार्थ गडकरींची जाहीर सभा झाली. यावेळी गडकरींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.

आम्हाला चिंता तरुणांना रोजगार देण्याची, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या मुलांना रोजगार मिळवून देण्याची चिंता आहे, असा आरोप गडकरींनी केला.

“मेरा भारत महान और मुझे नही दिया तो दे दो कम से कम देशी दारु का दुकान”, अशी मिश्किल टिप्पणी गडकरींनी केली. गडकरी म्हणाले, एक पाव डटाओ, गरिबी हटाओ, हो गया विकास… ना जात पर ना बात पर, सोनियाजी और शरद पवार के हात पर, अशा कोपरखळ्या गडकरींनी लगावल्या.

“भाजपच्या काळात महाराष्ट्राचा चोफेर विकास झाला आहे. पाच लाख कोटीचे रस्ते मी बांधलेत. आपण,आपली मुले, आणि नातंवडे असेपर्यंत खड्डे पडणार नाहीत याची काळजी मी घेतली. दहा हजार कोटींची बुद्ध सर्किटचं काम पूर्ण करत आहोत. राम जानकी सर्किटचं काम पूर्ण करत आहोत. मी फोकनाड नेता नाही. जे बोलतो ते करून दाखवतो”, असं गडकरींनी सांगितलं.

पाकिस्तानने भाईचारा ठेवला नाही, निरापराध लोकांना मारतात. म्हणून मी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं, आपल्या तीन नद्यांचं पाणी बंद करणार. पाकिस्तान तडफडून मरणार होते, असं गडकरी म्हणाले.

सोलापुरात काँटे की टक्कर

2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 साली मोदीलाटेमुळे शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, सोलापूरची जागा काँग्रेसची हक्काची जागा मानली जाते. मात्र, यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे आव्हान असल्याने सोलापूरची लढत रंगतदार होणार, हे निश्चित.

संबंधित बातम्या

माझी शेवटची निवडणूक, मला विजयी करा : सुशीलकुमार शिंदे  

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.