नितीन गडकरी यांना पुन्हा भोवळ, राष्ट्रगीतावेळी चक्कर

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा एकदा भोवळ आली. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात समारोपावेळी राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना भोवळ आली.

नितीन गडकरी यांना पुन्हा भोवळ, राष्ट्रगीतावेळी चक्कर
Follow us
| Updated on: Aug 01, 2019 | 2:03 PM

सोलापूर : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा एकदा भोवळ आली. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात समारोपावेळी राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना भोवळ आली. राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरी खाली बसले आणि पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना भोवळ आली. यावेळी मंचावर सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.

दरम्यान, नितीन गडकरी यांना सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात भोवळ आल्यानंतर त्यांना तातडीने कुलगुरुंच्या निवास्थानी विश्रांतीसाठी नेण्यात आलं. तिथे थोडावेळ थांबून ते नागपूरकडे रवाना झाले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून विश्रांतीसाठी नागपूरकडे रवाना झाले.

गडकरींची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे नियोजित सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत.  सोलापूर, सांगली येथे त्यांचे दौरे नियोजित होते, ते रद्द करण्यात आले.

याआधी नगरमधील राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 7 डिसेंबर 2018 रोजी राहुरीत त्यांना चक्कर आली होती. त्यावेळीही राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना अचानक चक्कर आली होती, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले होते.

त्यानंतर शिर्डीत 27 एप्रिल 2019 रोजी  लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान सदाशिव लोखंडे यांची प्रचारसभा आयोजित केली होती. त्यावेळी भाषणादरम्यान ते तीन वेळा सरबत प्यायले. त्यानंतर ते भाषण देण्यास उठले. मात्र त्यांना तब्येत जास्त बिघडत असल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी भाषण आटोपलं. त्यानंतर ते आपल्या जागेवर बसायला जाणार तेव्हा अचानक त्यांना चक्कर आली होती.

त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात भर मंचावर गडकरींना भोवळ येण्याची ही आजची तिसरी वेळ आहे.

नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. सध्या ते केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले नितीन गडकरी हे पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रीय झाले. नंतर भारतीय जनता पक्षात सक्रीयपणे काम करु लागले. सर्वसामान्य कार्यकर्ता ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, असा त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास आहे. महाराष्ट्रात युतीचं सरकार असताना नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. या काळात गडकरींनी केलेल्या कामाचं आजही कौतुक होतं. सध्याच्या मोदी सरकारमध्ये सर्वात आश्वासक चेहरा म्हणून नितीन गडकरी परिचीत आहेत.

संबंधित बातम्या 

नितीन गडकरी चक्कर येऊन कोसळले 

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.