देवेंद्र फडणवीस यांना नितीन गडकरी पर्याय का? भाजप नेत्याने स्पष्टच सांगितले

nitin gadkari devendra fadnavis: विधानसभा निवडणुकीत जागावाटप होण्यापूर्वी अमुक प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्तेला वाटते, ही जागा आपल्याकडे असली पाहिजे. परंतु जागावाटप तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते एकमताने करतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणताही नवीन प्रकल्प राज्यात आला नाही. अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली, असा आरोप उपाध्ये यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांना नितीन गडकरी पर्याय का? भाजप नेत्याने स्पष्टच सांगितले
nitin gadkari devendra fadnavis
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 3:14 PM

महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजपची निवडणूक तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पर्याय आहेत का? असा प्रश्न भाजप प्रवक्त केशव उपाध्ये यांना नाशिकमध्ये विचारला. त्यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रमध्ये गडकरी साहेब भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत अन् देवेंद्र फडणवीस देखील भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. दोन्ही भाजप नेते आमच्यासाठी आदरस्थानी आहेत.

काँग्रेसला आले नैराश्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे. त्यावर बोलताना केशव उपाध्ये म्हणाले, पंतप्रधान देशाचे आहे. कुठल्या पक्षाचे नाही. दुर्दैवाने त्याचे भान काँग्रेसला राहिले नाही. पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्याचे काम काँग्रेस करत आहे. यामधून त्यांना आलेले नैराश्य दिसत आहे.

संजय राऊत यांच्यासाठी योजना

मालवणमधील शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली आहे. पण पंडित नेहरू यांनी शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट उद्गार काढले. त्याची आठवण काँग्रेसला करून द्यायची का? असे उपाध्ये यांनी विचारले. संजय राऊत यांनी बडबड करण्यापेक्षा एखादे सकारात्मक काम दाखवे. रोज सकाळी उठून मोदीजी अन् देवेंद्रजी यांच्याबद्दल, सरकार बद्दल नकारात्मक भाषा ते करतात. त्यांनी केलेले सकारात्मक काम दाखवे आणि बक्षीस मिळवे, अशी योजना आणली तर त्याचे बक्षीस घ्यायला महाराष्ट्रातील एकही माणूस पुढे येणार नाही.

हे सुद्धा वाचा

तिन्ही नेते एकसंघ

तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, महायुती सरकारमध्ये तीन वेगळ्या प्रकारचे पक्ष आहेत. तीन वेगळ्या प्रकारच्या पक्षातील एखाद्या नेत्याची भूमिका वेगळी असू शकते. महायुती म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकसंघ पद्धतीने काम करत आहेत. भाजप मोठा पक्ष आहे पुढच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा जागा वाटपात सुद्धा मोठा घटक पक्ष असेल.

विधानसभा निवडणुकीत जागावाटप होण्यापूर्वी अमुक प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्तेला वाटते, ही जागा आपल्याकडे असली पाहिजे. परंतु जागावाटप तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते एकमताने करतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणताही नवीन प्रकल्प राज्यात आला नाही. अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली, असा आरोप उपाध्ये यांनी केला.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.