अजित पवारांना अभय, फक्त कमकुवत भुजबळांना तुरुंगात डांबलं : ओवेसी

अमरावती : एमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतलाय. सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना तुरुंगात डांबण्यात येईल अशी घोषणा फडणवीस यांनी केली. मात्र कमजोर असलेल्या भुजबळ सोडून कुणालाच तुरुंगात डांबले नाही. शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी हे सगळे एकाच खानदानातील पक्ष असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला. अमरावती […]

अजित पवारांना अभय, फक्त कमकुवत भुजबळांना तुरुंगात डांबलं : ओवेसी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

अमरावती : एमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतलाय. सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना तुरुंगात डांबण्यात येईल अशी घोषणा फडणवीस यांनी केली. मात्र कमजोर असलेल्या भुजबळ सोडून कुणालाच तुरुंगात डांबले नाही. शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी हे सगळे एकाच खानदानातील पक्ष असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला.

अमरावती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या प्रचारार्थ अमरावती शहरातील चांदनी चौक येथील अकॅडमिक मैदानावर ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ओवेसी बोलत होते.

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि त्यांच्यानंतरची शिवसेना यात बदल झालाय. आताची शिवसेना भाजपसमोर लाचार झाली आहे. मोदींसमोर शिवसेना मांजर झाली आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली.

मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांपैकी काहीच केलं नाही. दोन कोटी रोजगाराचं काय? 15 लाख गरीबांच्या खात्यात टाकणार होते त्याचं काय? नोटबंदीने पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्या त्याचं काय? त्यामुळे खोट्या आश्वासनानंतर या सरकारला आता खाली खेचण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खोटारडेपणा आणखी किती दिवस सहन करणार. प्रकाश आंबेडकर यांना साथ द्या, असं आवाहन असुदुद्दीन ओवेसी यांनी केलं.

VIDEO : काय म्हणाले ओवेसी?

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.