लोहा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव; शरद पवार पाटील पदावरून पायउतार

लोहा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव; शरद पवार पाटील पदावरून पायउतार

जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणून त्यांना पायउतार करण्यात आलं आहे. लोहा नगरपरिषद भाजपाच्या ताब्यात आहे, भाजपाचे खासदार प्रताप पाटील खतगावकर यांचा हा गड माणला जातो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Mar 30, 2022 | 1:10 PM

नांदेड : जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेच्या (Loha Municipal Council) उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणून त्यांना पायउतार करण्यात आलं आहे. लोहा नगरपरिषद भाजपाच्या (BJP) ताब्यात आहे, भाजपाचे खासदार प्रताप पाटील खतगावकर (Pratap Patil Khatgaonkar) यांचा हा गड माणला जातो.  अडीच वर्षांसाठी भाजपाचे शरद पवार पाटील यांना उपनगराध्यक्ष करण्यात आले होते. अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना राजीनामा देण्याचे आदेश खासदारांनी दिले होते, मात्र उपनगराध्यक्ष पद सोडण्यास शरद पवार तयार नव्हते . तेव्हा भाजपा नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणून त्यांना पायउतार केले. भाजपाच्या 12 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. काँग्रेसचे पाच नगरसेवक तटस्थ राहिले. दरम्यान उपनगराध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागल्याने शरद पवार यांनी नाराजी व्यक्ती केली आहे. अविश्वासाचा ठराव संमत झाल्यानंतर त्यांनी  खासदार प्रताप पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अडीच वर्षांसाठी नियुक्ती

लोहा नगरपरिषद भाजपाच्या ताब्यात आहे. नगरपरिषदेवर उपनगराध्यक्ष म्हणून शरद पवार पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर पदाचा राजीनामा द्यावा अशा सूचना खासदार प्रताप पाटील खतगावकर यांनी शरद पवार यांना दिल्या होत्या, मात्र तरी देखील ते राजीनामा देत नसल्याने अखेर भाजपा नगरसेवकांकडून त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला. अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्याने त्यांना अखेर पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

प्रताप पाटील खतगावकरांवर टीका

शरद पाटील यांना यापूर्वीच खासदार प्रताप पाटील खतगावकर यांनी पद सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांनी राजीनामा न दिल्याने नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणला. यावेळी भाजपाच्या 12 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर  काँग्रेसचे पाच नगरसेवक तटस्थ राहिले. दरम्यान उपनगराध्य पदावरून पायउतार व्हावे लागल्याने शरद पवार यांनी नाराजी व्यक्ती केली आहे. अविश्वासाचा ठराव संमत झाल्यानंतर त्यांनी  खासदार प्रताप पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

संबंधित बातम्या

Nanar Refinery Project: बारसूलाच रिफायनरी प्रकल्प उभारण्याची मागणी का?; वाचा सविस्तर

Aurangabad | घरकुल योजनेत श्रेयासाठी डॉ. भागवत कराडांकडून संभ्रम, खासदार इम्तियाज जलील यांचे आरोप काय?

Nanar Refinery Project : विदर्भात नाणार प्रकल्प नेण्यासाठी काँग्रेस नेता मला भेटला: संजय राऊत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें