लातूरमध्ये पाण्याचं विघ्न, विसर्जनच नाही, मूर्ती महापालिकेकडे जमा

गणेश भक्तांनीही मूर्ती पाण्यात विसर्जित न करता एकमेकांना भेट म्हणून देणे किंवा महापालिकेकडे जमा (Latur Ganpati Visarjan) करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे निसर्गाचा समतोलही राखला जाणार आहे.

लातूरमध्ये पाण्याचं विघ्न, विसर्जनच नाही, मूर्ती महापालिकेकडे जमा

लातूर : संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन लातूरमध्ये गणपती मूर्तीचं विसर्जन (Latur Ganpati Visarjan) टाळलं जात आहे. महापालिकेच्या वतीने गणपती मूर्ती एकत्रित केल्या जात आहेत. गणेश भक्तांनीही मूर्ती पाण्यात विसर्जित न करता एकमेकांना भेट म्हणून देणे किंवा महापालिकेकडे जमा (Latur Ganpati Visarjan) करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे निसर्गाचा समतोलही राखला जाणार आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या आवाहनाला गणेश भक्तांनी प्रतिसाद दिलाय.

महापालिकेने दान करण्यासाठी येणाऱ्या गणपती मूर्तींच्या संकलनासाठी संकलन केंद्र देखील स्थापन केली आहेत. विसर्जन न करता मूर्ती संकलनाचं प्रशासनाने आवाहन केल्यानंतर लोकही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून लातूर जिल्हा तीव्र पाणी टंचाईचा सामना करत आहे. त्यातच लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठीही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने नाईलाजाने मूर्ती जमा करावी लागली.

राज्यभरात उत्साहात विसर्जन

मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात उत्साहात बाप्पाला निरोप दिला जातोय. पुणे आणि मुंबईत विविध ठिकाणी पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन केलं जातंय. कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *