Weather Alert : राज्यातील तापमानात आणखी ३ ते ४ अंशाने घट होणार

राज्यात तापमानाचा नीचांक नाशिक जिल्ह्यातील ओझरमध्ये नोंदवला गेला. ओझरचे तापमान ४.९ अंश सेल्सियस होते. राज्यातील सर्वात उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या जळगाव, धुळ्याचे तापमान ५ .५ अंशावर आले आहे.

Weather Alert : राज्यातील तापमानात आणखी ३ ते ४ अंशाने घट होणार
cold_waveImage Credit source: cold_wave
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 10:48 AM

मुंबई : Weather Alert : राज्यात थंडीचा कडका सुरु आहे. सर्वात हॉट सीटी म्हणून ओळख असलेल्या खान्देशातील तापमान सर्वाधिक घसरण झालीय. उत्तर भारतातील शीतलहर तसेच दाट धुक्यामुळे राज्यातील थंडीत वाढ झाली आहे. बुधवारपासून अनेक ठिकाणी तापमानात आणखी घट होणार आहे. ही घट ३ ते ४ अंशाने होणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीचा कडाका अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील अनेक शहरांमधील किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून तीन चार दिवस थंडीच्या प्रकोपापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. राज्यासह देशात थंडीचा प्रकोप सुरु आहे. मंगळवारी १० जानेवारी महाराष्ट्रातील अनेक भागांत किमान तापमान घसरलंय. राज्यात तापमानाचा नीचांक नाशिक जिल्ह्यातील ओझरमध्ये नोंदवला गेला. ओझरचे तापमान ४.९ अंश सेल्सियस होते. राज्यातील सर्वात उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या जळगाव, धुळ्याचे तापमान ५ .५ अंशावर आले आहे. पुणे आणि नाशिकचे तापमान ७.४ अंशावर आलेय.

हे सुद्धा वाचा

कोणत्या शहराचे किती तापमान

ओझर ४.९ जळगाव ५.३ धुळे ५.५ पुणे ७.४ नाशिक ७.६ औरंगाबाद ७.७ गोंदिया ८.६ गडचिरोली ९.२ नागपूर ९.२ यवतमाळ ९.५

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.