Nitesh rane : 28 नोव्हेंबर बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा, ठाकरे सरकारवर नितेश राणेंचा जोरदार प्रहार

महाविकास आघाडी सरकारवर नितेश राणेंनी जोरदार प्रहार केलाय. 28 नोव्हेंबर खऱ्या अर्थाने बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा. अशी खरमरीत टीका नितेश राणे यांनी केली आहे.

Nitesh rane : 28 नोव्हेंबर बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा, ठाकरे सरकारवर नितेश राणेंचा जोरदार प्रहार
नितेश राणे, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 1:49 PM

सिंधुदुर्ग : ठाकरे सरकारनं दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारवर नितेश राणेंनी जोरदार प्रहार केलाय. 28 नोव्हेंबर खऱ्या अर्थाने बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा. अशी खरमरीत टीका नितेश राणे यांनी केली आहे. मुख्यमंत्री इतके खंबीर आहेत की बिचारे हॉस्पिटलमध्ये आजारी पडले आहेत.  मुख्यमंत्री घराच्या बाहेर निघत नाहीत, असा मुख्यमंत्री राज्याला पहिल्यांदा भेटला आहे. असंही नितेश राणे यांनी म्टलं आहे.

28 नोव्हेंबर बेईमान दिवस साजरा करा

हिंदुत्वाशी बेईमानी, महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी, स्वतःच्या वडिलांच्या विचाराशी बेईमानी, शेतकरी, कामगार सगळ्यांशी बेईमानी करून या ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हा दिवस बेईमान दिवस म्हणून साजरा करावा असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल

93 च्या बॉम्ब स्फोटातील जे प्रमुख आरोपी आहेत,  त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले नवाब मलिक यांच्याच मंत्रिमंडळात आहेत. माजी गृहमंत्री जेल मध्ये आहेत, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त चौकशीला गेले आहेत, सचिन वाझे यांनीच नेमले होते ते आज गजाआड झालेले आहेत. राज्याची प्रतिमा रसातळाला गेली आहे त्याला जबाबदार हे ठाकरे सरकार आहे. असा घणाघातही नितेश राणे यांनी केला आहे.

दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे घालण्यात दोन वर्षे गेली

दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे घालण्यात यांची दोन वर्षे गेली आहेत. धनंजय मुंढे यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. तुमच्या राष्ट्रवादी बद्दल माहिती देत बसलो तर नवाब मलिकांना महाराष्ट्रात फिरायला वेळ मिळणार नाही. असंही नितेश राणे म्हणालेत. आमच्या घरातलं आम्ही निश्चितपणे बघू. तुमच्या महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा सुरूआहे, त्याबद्दल मलिकांनी बोलावं. प्रत्येकाला मुख्यमंत्री बनायची स्वप्ने पडत चालली आहेत. असं आव्हान नितेश राणे यांनी मलिकांना दिलं आहे. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्यातून सरकारच्या मानसिकतेचे उत्तम उदाहरण असं म्हणत, नितेश राणेंनी आव्हाडांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला आहे. रझा अकॅडमी सारखी संस्था मोठी कोणी केली? याच उत्तम उदाहरण जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक सारखी लोक आहेत. आजच्या जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याची समस्त हिंदूंनी नोंद घ्यावी. असं आवाहनही नितेश राणे यांनी केलंय.

पीएफ खाते बंद झाले? चिंता नको, आता पाचशे रुपये भरून पुन्हा सुरू करता येणार खाते

Nawab Malik | पब, पार्टीत कोण असतं हे उद्यापासून आम्हाला काढायला लावू नका: नवाब मलिक

खराब बॅटिंगने लाजिरवाणा रेकॉर्ड, अजिंक्य रहाणेच्या निरोपाची वेळ, शतकवीर श्रेयस अय्यरला संधी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.