खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधितांना दिलासा; रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार 2360 रुपयांना

खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना कोरोनावर प्रभावी असणारं रेमडेसिवीर इंजेक्शन अल्प दरात मिळावं म्हणू राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधितांना दिलासा; रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार 2360 रुपयांना

मुंबई: खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना कोरोनावर प्रभावी असणारं रेमडेसिवीर इंजेक्शन अल्प दरात मिळावं म्हणू राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या इंजेक्शनचे दर सरकारने निश्चित केले असून आता हे इंजेक्शन अवघ्या 2360 रुपयांत कोरोनाबाधितांना मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्रही निश्चित करण्या आलं आहे. (now Remdesivir injections will available in 2360 rs in maharashtra)

राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणा-या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठया प्रमाणावर येत असून त्याची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित केलेल्या दरात रेमडेसीव्हर उपलब्ध होण्याकरीता अन्न व औषध प्रशासना मार्फत प्रत्येक जिल्हयातील खाजगी औषधी केंद्रे निश्चित केली आहेत. रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीवीर इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी संबंधितांना पत्राद्वारे केले आहे.

राज्यामध्ये ५९ औषध केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात ५, कोकण विभागात १०, नागपूर विभागात ६, औरंगाबाद विभागात ११, नाशिक विभागात ९, मुंबई विभागात ५ आणि पुणे विभागात १३ औषध विक्रेते निश्चित करण्यात आले आहेत.

इंजेक्शनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णालयाने त्याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. त्यासोबत प्रिस्क्रिप्शन, रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, आधार कार्ड किंवा छायाचित्र असलेले परवाना अथवा प्रमाणपत्र तसेच रुग्णाची वैद्यकीय माहिती कळविणे आवश्यक आहे. (now Remdesivir injections will available in 2360 rs in maharashtra)

संबंधित बातम्या:

‘रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि गरीबांचे मृत्यू थांबवा’, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पिंपरी-चिंचवडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दरानं विक्री, तिघांवर गुन्हा दाखल

पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश

(now Remdesivir injections will available in 2360 rs in maharashtra)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *