आता थेट कारखान्यातून साखर खरेदी करता येणार

पुणे : साखर कारखान्यांकडून आता थेट ग्राहकांना साखर विक्री करण्यात येणार आहे. थेट ग्राहकांना साखर विक्री करण्याचा देशातील पहिला प्रयोग पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये सुरू करण्यात आला आहे. शिक्रापूर येथे महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन पांडूरंग राऊत यांच्या उपस्थितीत या साखर विक्री केंद्रांचे उद्द्घाटन करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा या साखर कारखान्या मार्फत हे साखर विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. ग्राहकांना बाजारपेठे पेक्षा …

आता थेट कारखान्यातून साखर खरेदी करता येणार

पुणे : साखर कारखान्यांकडून आता थेट ग्राहकांना साखर विक्री करण्यात येणार आहे. थेट ग्राहकांना साखर विक्री करण्याचा देशातील पहिला प्रयोग पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये सुरू करण्यात आला आहे. शिक्रापूर येथे महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन पांडूरंग राऊत यांच्या उपस्थितीत या साखर विक्री केंद्रांचे उद्द्घाटन करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा या साखर कारखान्या मार्फत हे साखर विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. ग्राहकांना बाजारपेठे पेक्षा या साखर विक्री केंद्रावर दोन ते तीन रूपयांनी साखर स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे.

या पूर्वी साखर कारखान्यांना साखर विक्रीसाठी टेंडर काढून साखर विक्री करावी लागत असे, त्यामुळे साखर निर्मीती करून देखील साखर विक्री न झाल्याने साखर गोडावूनमध्येच पडून राहत होती. मात्र साखर आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता साखर कारखान्यांची साखर विक्री साखर केंद्रातून मोठ्या प्रमाणात झाल्यास साखर गोडावूनमध्ये जास्त दिवस पडून राहणार नाही आणि साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची  FRP रक्कम देणेही सोपे होणार आहे.

रात्रं-दिवस शेतकरी आपल्या शेतात राबून काबाड कष्ट करत आपले ऊसाचे पीक घेतो. परंतू या शेतकऱ्यांना आपण घेतलेल्या पिकाला कवडी मोल भाव मिळत असतो. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होते. परंतु या अशा प्रकारचे प्रयोग राज्यभर जर राबवण्यात आले, तर शेतकरी राजा नक्की सुखी होईल.

यासोबतच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. पुढील 10 ते 15 दिवसात एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती साखर आयुक्त यांनी दिली. जे साखर कारखाने पैसे देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच 135 कारखान्यांना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नोटिसा बजावल्या आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *