विठ्ठलाच्या ऑनलाईन दर्शनासाठी आता पैसे मोजावे लागणार

पंढरपूर : सध्या देशात मोठ्या प्रमाणात डिजीटलायझेशन सुरु झालं आहे. आज प्रत्येक क्षेत्रात आपण पाहिले असेल कॅशलेस व्यवहार, टिकीट बुकिंग, बँकिंग व्यवहार, सरकारी कागदपत्रे अशा अनेक गोष्टी आज आपण ऑनलाईद्वारे पाहतो. त्यात सरकराकडूनही डिजीटल इंडिया उपक्रमाद्वारे अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्यातच आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकिंग दर्शन सुरु करण्यात आले आहे. पंढरपूरला …

विठ्ठलाच्या ऑनलाईन दर्शनासाठी आता पैसे मोजावे लागणार

पंढरपूर : सध्या देशात मोठ्या प्रमाणात डिजीटलायझेशन सुरु झालं आहे. आज प्रत्येक क्षेत्रात आपण पाहिले असेल कॅशलेस व्यवहार, टिकीट बुकिंग, बँकिंग व्यवहार, सरकारी कागदपत्रे अशा अनेक गोष्टी आज आपण ऑनलाईद्वारे पाहतो. त्यात सरकराकडूनही डिजीटल इंडिया उपक्रमाद्वारे अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्यातच आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकिंग दर्शन सुरु करण्यात आले आहे.

पंढरपूरला जर आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी आला, तर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग दर्शनासाठी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. ही सेवा मकरसंक्रांती नंतर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहाय्यक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मागील काही वर्षापासून  मोफत ऑनलाइन दर्शन बुकिंग सुविधा सुरु केली होती. यामुळे भाविक दर्शन बुकिंग करून त्याच वेळेत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येत होते. मात्र या ऑनलाईन बुकिंगचा फायदा प्रत्येक ठिकाणच्या इंटरनेट कॅफेला होत होता, समितीला यातून काहीच उत्पन्न मिळत नव्हते. यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यापुढे ऑनलाइन दर्शनासाठी प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाईन दर्शन सशुल्क केल्याने मंदरे समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असून वर्षाकाठी अंदाजे 4 कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *