साई भक्तांना दिलासा; आजपासून शिर्डीत ऑफलाईन दर्शन पासची सुविधा सुरू

शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. साई बाबांच्या दर्शनासाठी आता ऑफलाईन पासची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी दर्शनासाठी केवळ ऑनलाईनच पास मिळत होता

साई भक्तांना दिलासा; आजपासून शिर्डीत ऑफलाईन दर्शन पासची सुविधा सुरू


अहमदनगर – शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. साई बाबांच्या दर्शनासाठी आता ऑफलाईन पासची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी दर्शनासाठी केवळ ऑनलाईनच पास मिळत असल्यामुळे अनेक भाविकांना इच्छा असूनही दर्शन घेने शक्य होत नव्हते. तसेच ऑनलाईन पास मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यंत्रणेमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे आता भक्तांसाठी ऑफलाईन पास सुरू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

दिवसभरात मिळणार 10 हजार पास

ऑफलाईन पास सुरू करण्यात आल्यामुळे भक्तांना दिलासा मिळाला आहे. ज्या भाविकांना साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन पास काढणे शक्य नव्हते त्यांना आता ऑफलाईन पास काढून साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. साई दर्शनासाठी दिवसभरात 15 हजार ऑनलाईन तर 10 हजार ऑफलाईन पास वितरीत केले जाणार आहेत.

दर्शन मर्यादेत वाढ 

ऑफलाईन पास सुरू करण्यासोबतच दर्शन मर्यादा वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. नव्या दर्शन मार्यादेनुसार आता एका दिवसांत 25 हजार भाविकांना साईबाबाचे दर्शन घेता येणार आहे. या भाविकांसाठी 15 हजार ऑनलाईन तर 10 हजार ऑफलाईन पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नुकतीच जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑनलाईन प्रणालीमध्ये गोंधळ 

काही दिवसांपूर्वी ऑनलाई पास वितरणामध्ये गोंधळ निर्माण झाला होता. सदोष यंत्रणेमुळे ऑनलाई पाससाठी अल्पाय करणाऱ्या भाविकांच्या खात्यातून पैसे कटत होते. मात्र त्यांना तरी देखील पास मिळत नव्हता. त्यामुळे सतंप्त झालेल्या भाविकांनी साई मंदिरासमोर ठिय्या मांडला होता. अखेर पोलिसांच्या मध्यस्थिने ज्यांचे पैसे कटले आहेत, मात्र त्यांना पास मिळाला नाही अशा भाविकांना साई बाबांच्या दर्शनाची परवानगी देण्यात आली होती.

संबंधित बातम्या 

फ्रान्सचा मॉरीस कोंबडा नेहमीच बांग देतो, भाजपच्या गरूड भरारीपुढे टिकणार नाहीत, फडणवीसांचा नवाब मलिकांना अप्रत्यक्ष टोला

…तर भुजबळांविरोधातली याचिका मागे घेणार; आमदार कांदेंची अट; अन्यथा दरी वाढेल असा इशारा

ठाकरे सरकारकडून राजकारणाचे गुन्हेगारीकरण; आशिष शेलारांनी केला आघाडीचा पंचनामा

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI