राज्यातील दुष्काळी गावांची संख्या वाढणार?

नागपूर : सरकाने 268 महसुली मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. याशिवाय काही मंडळांमध्ये भीषण परिस्थिती असल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्यामुळेच नवीन मंडळांना किंवा गावांना दुष्काळी म्हणून समाविष्ट करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सूचवलेल्या गावांवर समिती निर्णय घेतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यावरुन येत्या काळात महाराष्ट्रातील दुष्काळी …

राज्यातील दुष्काळी गावांची संख्या वाढणार?

नागपूर : सरकाने 268 महसुली मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. याशिवाय काही मंडळांमध्ये भीषण परिस्थिती असल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्यामुळेच नवीन मंडळांना किंवा गावांना दुष्काळी म्हणून समाविष्ट
करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी सूचवलेल्या गावांवर समिती निर्णय घेतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यावरुन येत्या काळात महाराष्ट्रातील दुष्काळी मंडळं आणि गावांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज नागपूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात एक नगरपालिका सोडल्यास पाण्याची टंचाई नाही. शिवाय जूनपर्यंत पुरेल एवढा चारा गुरांना उपलब्ध आहे. असंही चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. शिवाय येत्या काळाच  टँकरशिवाय पाईपद्वारे पाणीपुरवठ्यावर भर दिला जाईल, असंही चंद्रकांत दादा म्हणाले. नागपुरात टंचाई आढावा बैठकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *