बीडमध्ये नर्सची छेड काढल्याचा आरोप, नर्सच्या नातेवाईकांकडून आरोपीला चोप

बीड जिल्हा रुग्णालयातील एका पुरुष कर्मचाऱ्याला नर्सच्या नातेवाईकाकडून बेदम मारहाण (Nurse relatives beat man who molested) करण्यात आली आहे.

बीडमध्ये नर्सची छेड काढल्याचा आरोप, नर्सच्या नातेवाईकांकडून आरोपीला चोप

बीड : बीड जिल्हा रुग्णालयातील एका पुरुष कर्मचाऱ्याला नर्सच्या नातेवाईकाकडून बेदम मारहाण (Nurse relatives beat man who molested) करण्यात आली आहे. हा कर्मचारी रुग्णालयातील नर्सेसची छेड काढतो, असा आरोप रुग्णालयातील नर्सकडून करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांच्या मारहाणीचा व्हिडीओ ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागला आहे. या प्रकारामुळे आज (5 जून) दुपारी अर्धा तास बीड जिल्हा रुग्णालय बंद होतं (Nurse relatives beat man who molested).

बीडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाला एका खासगी इमारतीत स्थलांतरित करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात नर्सेसची छेडछाड केली जात होती. छेडछाड करणारा दुसरा तिसरा कुणी नसून रुग्णालयातील एक कर्मचारीच होता. त्या कर्मचाऱ्याविरोधात सर्व नर्सेसने वरिष्ठांकडे लेखी तक्रारदेखील केली आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

याबाबत शेवटी एका नर्सने नातेवाईकांना सांगितलं. नर्सचे नातेवाईक आज जिल्हा रुग्णालयात आले. यावेळी नर्सेसची छेड काढणारा कर्मचारी आणि नर्सचा नातेवाईक या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. रुग्णालयात प्रचंड दगडफेक झाली. रुग्णालयातील खुर्च्या तुटल्या आहेत. यावेळी रुग्णालयातील रुग्ण आणि नर्सदेखील घाबरले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

संबंधित बातम्या :

कोरोना’ने आठ दिवसांच्या बाळाचं मातृछत्र हिरावलं

नागपुरात दोघा ‘सारी’ग्रस्त रुग्णांचा ‘कोरोना’ने मृत्यू

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *