‘त्या’ वादानंतर लक्ष्मण हाके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले…

ओबीसी समाजाचे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करुन वाद घातल्याचा आरोप काही तरुणांनी केला. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करुन लक्ष्मण हाके यांनी वाद घातल्याचा दावा मराठा तरूणांनी काल केला होता. आता या मुद्यावर लक्ष्मण हाके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे

'त्या' वादानंतर लक्ष्मण हाके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...
'त्या' वादानंतर लक्ष्मण हाके यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 9:34 AM

ओबीसी समाजाचे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करुन वाद घातल्याचा आरोप काही तरुणांनी केला. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करुन लक्ष्मण हाके यांनी वाद घातल्याचा दावा मराठा तरूणांनी काल केला होता. आता या मुद्यावर लक्ष्मण हाके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली. ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. कालच्या राड्यामागे संभाजीराजे छत्रपती  आहेत. मला जीवे मारण्याचा प्रयत्न होता, असा आरोप त्यांनी केला आहे. पण मला गोळ्या घातल्या तरी मी थांबणार नाही, असेही हाके म्हणाले.

दरम्यान कालच्या राड्यानंतर हाके यांची सुरक्षा वाढण्यात आली आहे. काल मराठा आंदोलक आणि लक्ष्मण हाके समोरासमोर आले होते.  त्यानंतर आता नागपूर पोलिसांनी हाकेंची सुरक्षा वाढवली आहे.

मी वॉकिंगला गेलो असता 5 वाजता मला तो मुलगा भेटला होता. त्या मते नावाच्या मुलाचा सीडीआर किंवा मोबाईल तपासला तर त्याने कुणाकुणाला कॉल केले याचे डिटेल्स जरी घेतले तरी त्यांचा कसा पूर्वनियोजित कट होता, ते समजेल. ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर केली टीका

पण याही पलीकडे जाऊन कोल्हापूरचा एक नेता ,स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपडणारा, त्यांना मी फक्त कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणाची आठवण करून दिली. छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्याची आठवण करून दिली आणि महाराष्ट्रात असलेल्या 50 ते 60 टक्के ओबीसी हा आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारे आहोत, त्या गादीला मानणारे आहोत. कोल्हापूरचा तो नेता रयतेचा राजा असता तर तो ओबीसींच्या आंदोलनालाही भेट द्यायला आला असता, ही माफक अपेक्षा ओबीसींचा नेता म्हणून महाराष्ट्रासमोर मांडली. आम्ही तुम्हाला राजा का म्हणावं ? हा प्रश्न फक्त कोल्हापूरच्या संभाजी भोसले यांना मी विचारला. मला वाटलं ते हे खिलाडू वृत्तीनं घेतील, काही आत्मपरीक्षण करेल, छत्रपतीं शिवरायांच्या रयतेचा कसा कारभार होता, ते पाहील. किंवा सामाजिक न्याया देणाऱ्या छत्रपती शाहूराजांचे विचार पाहील. पण त्या माणसाने माझ्या अंगावरीत मारेकरी घातले, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केले नसल्याचा निष्कर्ष

लक्ष्मण हाके यांच्यावर दारू प्यायल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. हाके यांनी दारू प्यायली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे.

याच मुद्याची आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकिय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात, असे समजते.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....