“भुजबळ, वडेट्टीवारांच्या पाठीशी बारा बलुतेदार, गरज पडली तर रस्त्यावर उतरु”

मराठा समाजाच्या नेत्यांनी मंगळवारी छगन भुजबळ आणी विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळाटून हकालपट्टी करावी अशी मगाणी राज्यपालांकडे केली. या मागणीचा आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतो, असे प्रकाश शेंडगे म्हणाले. (OBC leader Praksh Shendage)

"भुजबळ, वडेट्टीवारांच्या पाठीशी बारा बलुतेदार, गरज पडली तर रस्त्यावर उतरु"

मुंबई : “अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) तसेच पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा समाजाच्या (maratha) नेत्यांकूडन केली जात आहे. या मागणीचा आम्ही तीव्र स्वरुपात निषेध करतो,” असे म्हणत वेळ पडलीच तर त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरु अशी भूमिका ओबीसी (OBC) नेते प्रकाश शेंडगे (OBC leader Praksh Shendage) यांनी घेतली. मंगळवारी (29 डिसेंबर) मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत वडेट्टीवार आणि भुजबळ यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीला विरोध करताना शेंडगे यांनी वरील वक्तव्य केले. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (OBC leader Praksh Shendage supporting Chagan Bhujbal and Vijay Wadettiwar)

यावेळी बोलताना, “मराठा समाजाच्या नेत्यांनी मंगळवारी छगन भुजबळ आणी विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळाटून हकालपट्टी करावी अशी मगाणी राज्यपालांकडे केली. या मागणीचा आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतो,” असे शेंडगे म्हणाले. तसेच छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार ओबीसी आणि मराठा समाजाची भूमिका मांडत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करु असेही ते म्हणाले.

गरज पडल्यास रस्त्यावर उतरु

यावेळी बोलताना त्यांनी मराठा नेत्यांच्या मागणीचा निषेध केला. तसेच, भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्या समर्थनार्थ संघर्ष करण्यास तयार असल्याचे सांगितले. “छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवर मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही समाजाची बाजू मांडत आहे. पण मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करण्याची भाषा कुणी करत असेल तर आम्ही त्याविरोधात संघर्ष करु. ओबीसी आणि बारा बलुतेदार त्यांच्यासोबत ठामपमे उभा आहे. गरज पडली तर आम्ही सगळे वडेट्टीवार आणि भुजबळ यांच्यासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करु,” असे शेंडगे म्हणाले.

दरम्यान, मंगळवारी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी वडेट्टीवार आणि भुजबळ यांची तक्रार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून त्या दोघांचा  राजीनामा घ्यावा अशी मागणी केली होती. त्यांच्या याच मागणीमुळे प्रकाश शेंडगे यांनी यांनी भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

अनेक वर्षे सत्ता, तरी मराठा आरक्षण देता आलं नाही; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

“राज्याने मराठा आरक्षण कोर्टात टिकवलं नाही, सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग”

मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, समाजाचं नुकसान होऊ नये हीच प्रमाणिक भावना : अशोक चव्हाण

(OBC leader Praksh Shendage supporting Chagan Bhujbal and Vijay Wadettiwar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI