VIDEO : थकलेल्या आजोबांनी रेल्वेट्रॅकवरच ताणून दिली, रेल्वे आली, निघूनही गेली!

थकलेल्या माणसाला कधी, कुठे आणि कशी झोप लागेल हे सांगता येत नाही. मुंबईच्या लोकलमध्ये विंडो सीटवर हवेची झुळक घेत अनेकजण पहुडलेले दिसतात, तर बरेच जण भर गर्दीत उभ्या-उभ्या डुलकी मारतात. पण बेळगावमधल्या एका आजोबांची डुलकी आश्चर्यचकीत करणारी आहे.

VIDEO : थकलेल्या आजोबांनी रेल्वेट्रॅकवरच ताणून दिली, रेल्वे आली, निघूनही गेली!

बेळगाव : थकलेल्या माणसाला कधी, कुठे आणि कशी झोप लागेल हे सांगता येत नाही. मुंबईच्या लोकलमध्ये विंडो सीटवर हवेची झुळक घेत अनेकजण पहुडलेले दिसतात, तर बरेच जण भर गर्दीत उभ्या-उभ्या डुलकी मारतात. पण बेळगावमधल्या एका आजोबांची डुलकी आश्चर्यचकीत करणारी आहे.

थकलेल्या आजोबांना चक्क रेल्वेच्या भर ट्रॅकवरच ताणून दिली. आजोबांना इतकी गाढ झोप लागली, की त्या ट्रॅकवर रेल्वे आली, त्यांच्या वरुन रेल्वे गेली तरी त्यांना पत्ता लागला नाही. बेळगाव जिल्यातील गोकाक  रेल्वे स्टेशनजवळ हा प्रकार घडला.

अंगावरुन रेल्वे जात असताना रेल्वेच्या आवाजाने आजोबांना जाग आली, तोपर्यंत अर्धी रेल्वे पुढे गेली होती. मग आजूबाजूच्या लोकांनी आरडा-ओरडा करुन त्यांना तसंच पडून राहायला सांगितलं. त्यानंतर काही वेळाने रेल्वे थांबली आणि आजोबा हळूच ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडले.

आजोबांच्या अंगावरुन जी रेल्वे गेली ती मालगाडी होती. आजोबांना भर रेल्वे ट्रॅकवर अशी कशी काय झोप लागली? ट्रॅकवरुन रेल्वे गेली तरी आजोबांना साधं खरचटलंही कसं नाही? हे आजोबा कोण आहेत? अशा अनेक प्रश्न यानंतर गोकाक परिसरात चर्चिले जात होते.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *