मेथीची भाजी खाल्ल्याने वृद्धाचा मृत्यू, 7अत्यवस्थ

नांदेड: मेथीची भाजी खाल्ल्याने विषबाधा होऊन वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली. कोंडिबा कदम असं मृत्यू झालेल्या 60 वर्षीय वृद्धाचं नाव आहे. मेथी खाल्ल्याने एकाचा मृत्यू झालाच शिवाय अन्य 7 जणांना अस्वस्थ होऊ लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नांदेडच्या सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. उमरी तालुक्यातील कळगाव गावात ही धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी रात्री कदम …

मेथीची भाजी खाल्ल्याने वृद्धाचा मृत्यू, 7अत्यवस्थ

नांदेड: मेथीची भाजी खाल्ल्याने विषबाधा होऊन वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली. कोंडिबा कदम असं मृत्यू झालेल्या 60 वर्षीय वृद्धाचं नाव आहे. मेथी खाल्ल्याने एकाचा मृत्यू झालाच शिवाय अन्य 7 जणांना अस्वस्थ होऊ लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नांदेडच्या सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

उमरी तालुक्यातील कळगाव गावात ही धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी रात्री कदम कुटुंबाने मेथीची भाजी खाल्लाने हा प्रकार घडला. या विषबाधेमुळे कुटुंबातील एकाचा मृत्यू झाला. तर श्लोक शिवाजी कदम हा गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर उर्वरित सदस्यांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेणं तूर्तास सुरु आहे. या घटनेने उमरी तालुक्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

यापूर्वीही रायगडमध्ये जंगली भाज्या खाल्लाने एकाचा मृत्यू झाला होता.  तर दुधी भोपळयाचा एक ग्लास रस पिल्याने पुण्यात एका उच्चशिक्षित महिलेचा मृत्यू  झाल्याची घटना घडली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *