Rajesh Tope | महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

डोंबिवलीत राज्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये असेदेखील टोपे tv9 मराठीशी बोलताना म्हणाले आहेत.

Rajesh Tope | महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झालेला एक रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. याआधी कर्नाटक, गुजरातमध्ये ओमिक्रॉनने आपले हातपाय पसरले होते. ओमिक्रॉनने आता महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. डोंबिवलीत राज्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये असेदेखील टोपे tv9 मराठीशी बोलताना म्हणाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ओमिक्रॉनग्रस्त रुग्णाने लस घेतलेली नव्हती.

रुग्णाच्या संपर्कात पाच मिनिटेजरी आलं तरी ओमिक्रॉनची लागण

तसेच पुढे बोलताना “डोंबिवलीत कोरोनाचा रुग्ण ढाळल्यानंतर टोपे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद केला आहे. “घाबरण्याचे शून्य टक्केदेखील कारण नाही. या विषाणूचा मृत्युदर खूप कमी आहे. मात्र त्याचा संसर्गदर खूप आहे. डोंबिवलीत आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घ्यावा लागेल. त्यांचीदेखील चाचणी करावी लागेल. मला तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णाच्या संपर्कात पाच मिनिटेजरी एखादा व्यक्ती आला तर त्यालादेखील ओमिक्रॉनची लागण होते,” असे राजेश टोपे यांनी म्हणाले.

28 नमुने ओमिक्रॉनची चाचणी करण्यासाठी पाठवले 

डोंबिवलीतील रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. त्याला सौम्य लक्षणे आहेत. अंगदुखी, खोकला, डोकेदुखी अशा प्रकारची लक्षणे या रुग्णात आहेत. आज आपल्याला संसर्ग टाळायचा आहे. सध्या 28 नमुने ओमिक्रॉनची चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल दोन ते तीन दिवसांत येतील,” अशी माहिती टोपे यांनी दिली. तसेच कोरोना नियम शंभर टक्के पाळायला हवेत. नागरिकांनी लसदेखील घ्यावी, असेदेखील टोपे म्हणाले.

डोंबिवलीत आढळला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण 

दरम्यान, सुरुवातीला कर्नाटकमध्ये दोन व्यक्तींना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली होती. त्यानंतर आज गुजरातमध्येही एका वृद्ध व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा शिरकाव झालाय. कल्याण-डोंबिवलीमधील एका 33 वर्षीय तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. हा तरुण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून मुंबईत आला होता. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. जिनोमि सिक्वेन्सिंगसाठी त्याचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज या तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे.

इतर बातम्या :

Breaking : राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीत ओमिक्रॉनची लागण झालेला रुग्ण आढळला

उत्तर भारतात काळ्या कभिन्न ढगात चमकली उजेडाची रेषा, गूढ प्रकाशाने काळजाचा ठोका चुकला; कोणी म्हणालं, एलियन्स तर कोणी म्हणालं…

87 वर्षांचा तरुण, काळजात लोकशाहीचे धगधगते स्पिरीट, ओठात कैसे ढूंढना पाऊ…साहित्य संमेलनात भटकळांची मोहनमाया!


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI