शिवसेना सोडून गेलेल्या आणखी एका माजी आमदाराची घरवापसी

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली वेगात सुरु आहेत. शिवसेना सोडून गेलेल्या आणखी एका माजी आमदाराची घरवापसी होणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुरेश साळोखे यांची घरवापसी निश्चित झाली आहे. ते उद्या म्हणजे बुधवारी दुपारी एक वाजता ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश करतील. नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये साळोखे यांचाही समावेश होता. …

शिवसेना सोडून गेलेल्या आणखी एका माजी आमदाराची घरवापसी

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली वेगात सुरु आहेत. शिवसेना सोडून गेलेल्या आणखी एका माजी आमदाराची घरवापसी होणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुरेश साळोखे यांची घरवापसी निश्चित झाली आहे. ते उद्या म्हणजे बुधवारी दुपारी एक वाजता ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश करतील.

नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये साळोखे यांचाही समावेश होता. साळोखे दोन वेळा कोल्हापूर शहराचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जुना शिवसैनिक परत आल्याने कोल्हापुरात शिवसेनेला मोठं बळ मिळणार आहे.

शिवसेना सोडून गेलेल्या अनेकांची पुन्हा घरवापसी झाली आहे. नुकतेच मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनीही पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी शिवसेना सोडून मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. पण शिवसेनेची ओढ लागल्याने आपण घरवापसी करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना सोडणारे आणखी एक आमदार म्हणजे कालिदास कोळंबकर. ते सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांचाही भाजप प्रवेश जवळपास निश्चित झालाय. काही अटी ठेवत त्यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय.

कोण आहेत सुरेश साळोखे?

6 मे 1986 ला कोल्हापुरात शिवसेनेची स्थापना
1986 ते 1990 -जिल्हाप्रमुख
1992 ला जिल्हाप्रमुखपदी फेरनिवड
1995 ला आमदार
2000 साली आमदार
2005 साली मालोजीराजेंकडून पराभूत
2005 ला नारायण राणेंसोबत शिवसेनेतून बाहेर
2015 ला मनसेमधून विधानसभा लढवली

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *