मालेगावात कांद्याच्या ढीगावर शेतकऱ्याची आत्महत्या

नाशिक : कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्याच्या ढीगावर स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. मालेगाव तालुक्यातील कंधाने येथील ही घटना आहे. कांदा साठवून ठेवलेल्या ढीगावर या शेतकऱ्याने विष प्राशन केलं आणि आत्महत्या केली. ज्ञानेश्वर दशरथ शिवणकर असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. कांदा विकून उत्पादन खर्चही नसल्याने या शेतकऱ्याने आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे …

मालेगावात कांद्याच्या ढीगावर शेतकऱ्याची आत्महत्या

नाशिक : कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्याच्या ढीगावर स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. मालेगाव तालुक्यातील कंधाने येथील ही घटना आहे. कांदा साठवून ठेवलेल्या ढीगावर या शेतकऱ्याने विष प्राशन केलं आणि आत्महत्या केली. ज्ञानेश्वर दशरथ शिवणकर असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

कांदा विकून उत्पादन खर्चही नसल्याने या शेतकऱ्याने आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कमालीचे घसरले आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्यासह इतर शेतकरी हतबल झाले आहेत. या हतबलतेतून या शेतकऱ्यावर जीवनयात्रा संपवण्याची वेळ आली. वाचा कांद्याचे पैसे मोदींना पाठवल्याने इगो हर्ट, शेतकऱ्याची चौकशी सुरु

कांदा काढून अनेक दिवस झाले होते. भाव वाढेल अशी अपेक्षा होती. पण भाव वाढले नाही. अनेक दिवसांपासून कांदा साठवून ठेवला होता. साठवून ठेवलेल्या या कांद्याला कोंब फुटले. ही परिस्थिती शेतकऱ्याला सहन झाली नाही आणि त्याने विश प्राशन करुन आत्महत्या केली. वाचातीन टन कांदा विक्रीतून 6 रुपये उरले, शेतकऱ्याने मनी ऑर्डरने मुख्यमंत्र्यांना पाठवले!

कांदा विक्रीतून 6 रुपये

संगमनेरच्या  अकलापूर येथील श्रेयस आभाळे यांनी दोन एकर कांद्याची लागवड केली. त्यातून त्यांना जवळपास तीन टन कांद्याचं उत्पन्न मिळालं. जीवापाड मेहनतीने कांदा पिकवला, मात्र त्याला मातीमोल भाव मिळाला. अवघे सहा रुपये खिशात घेऊन कसे यायचे, यापेक्षा त्यांनी तेच सहा रुपये मुख्यमंत्र्यांना पाठवले.  मनीऑर्डर करुन श्रेयस आभाळे यांनी हे सहा रुपये मुख्यमंत्र्यांना पाठवले.

कांद्याला 51 पैसे भाव

दुसरीकडे नाशिकच्या येवला तालुक्यातील अंद्रसूल गावच्या चंद्रकांत भिकान देशमुख यांनाही हाच अनुभव आला. चंद्रकांत देशमुख यांनी 545 किलो कांदा विक्रीतून केवळ 216 रुपये मिळाले. म्हणजेच कांद्याला केवळ 51 पैसे प्रति किलोचा भाव मिळाला. येवल्यातील कांदा लिलावात त्यांना हा तुटपुंजा भाव मिळाला. त्यामुळे हतबल झालेल्या चंद्रकांत देशमुख यांनीही 216 रुपयांची मनी ऑर्डर मुख्यमंत्र्यांना केली.

यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संजय साठे यांनीही कांदा विक्रीतून उरलेले 1064 रुपये मनी ऑर्डरने पंतप्रधान मोदींना पाठवले. मात्र या शेतकऱ्याची चौकशी सुरु झाली आहे. शेतकरी संजय साठे एखाद्या पक्षाशी संबधित आहे का, शेती किती, एखाद्या पक्षाने सांगितल्यावरून हा स्टंट केला का अशा अनेक अंगाने ही उलटसुलट चौकशी होत आहे. त्यामुळे संजय साठे पुरते वैतागले आहेत. यातच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या विषयावर तयार झालेल्या अहवालाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यातील आशयावरून त्यांना अधिकच धक्का बसला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *