अवघा रंग एक झाला; दिवाळीनिमित्त येवला येथे रंगली रांगोळी स्पर्धा!

कोणी साक्षात विठू माऊली आपल्या रांगाोळीतून साकारले, तर कोणी पैठणीच्या पदरावर नाचरा मोर काढून या अभिनव उपक्रमात भाग घेतला.

अवघा रंग एक झाला; दिवाळीनिमित्त येवला येथे रंगली रांगोळी स्पर्धा!
दिवाळीनिमित्त येवला येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 12:08 PM

लासलगावः पैठणीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या येवल्यात रांगोली स्पर्धा रंगली. कोणी साक्षात विठू माऊली आपल्या रांगाोळीतून साकारले, तर कोणी पैठणीच्या पदरावर नाचरा मोर काढून या अभिनव उपक्रमात भाग घेतला.

महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता येवल्यातील कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने या भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन शहरात करण्यात आले होते. या रांगोळी स्पर्धेमध्ये महिला तसेच युवतींनी तासन तास आपल्या कलेच्या माध्यमातून आकर्षक अशा रांगोळ्या काढल्या. त्यात पैठणीच्या पदरावर नाचरा मोर तसेच जनजागृतीचे संदेश देणारी रांगोळी, संस्कार भारती रांगोळी, हस्तकला रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी, देवांच्या रांगोळ्या, आकाराचे व विषयाचे बंधन नसलेली रांगोळी अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या. यावेळी 150 स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. प्रत्येक स्पर्धकास कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने आकर्षक असे बक्षीस देखील यावेळी देण्यात आले. रांगोळ्या पाहण्यास शहरातील नागरिकांसह बाहेरगाहून आलेल्या पाहुणे मंडळींनी गर्दी केली. त्यांनी रांगोळ्यांचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आणि वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरही ते चांगलेच व्हायरल झाले.

गोवर्धन पूजन उत्साहात

लासलगाव येथील श्री भक्तवसल्य बालाजी मंदिरात गोवर्धन पूजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. डॉक्टर श्रीधर दायमा यांनी सपत्नीक गोवर्धन पूजन केले. या पूजनापूर्वी गोविंद सेवकांनी विविध भजनाचे गायन केले. त्यामुळे भक्त तल्लीन झाले होते. गोवर्धन पूजनानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गोवर्धन पूजन आणि आरतीनंतर भक्त मंडळींना प्रसादाचे वाटप करण्यात आले. जमलेल्या उपस्थितांनी यावेळी एकमेकांवा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पैठणीला मागणी

येवल्यातल्या पैठणीला दिवाळी सणानिमित्त चांगलीच मागणी होती. पंचक्रोशीतील अनेकांनी येवला गाठून पैठणीची खरेदी केली. कपडे बाजार, सराफा बाजार आणि वाहन बाजारातही दिवाळीनिमित्त कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनामुळे बाजारपेठेवर मरगळ आली होती. मात्र, रुग्ण कमी होताच गणरायाच्या आगमनापासून बाजारपेठेची स्थिती सुधारताना दिसत आहे. आता दिवाळीपूर्वी सारेच निर्बंध शिथिल झाल्यानेही बाजारपेठेत रौनक आलेली दिसत आहे. (Organizing Rangoli competition on the occasion of Diwali at Yeola)

इतर बातम्याः

100 टक्के लसीकरणासाठी 30 नोव्हेंबरची डेडलाईन; नाशिक विभागातल्या मोहिमेला पुन्हा गती!

महाराष्ट्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावा; नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी

‘कवच कुंडल’ विरुद्ध ‘हर घर दस्तक’; कोणती लसीकरण मोहीम राबवायची, राज्यातले आरोग्य कर्मचारी पेचात!

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.