सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई; सतेज पाटील यांची प्रतिक्रिया काय?

आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं असतं. पक्ष सोडण्याच्या एखाद्या चर्चेमुळे त्याचं राजकीय करियर खराब होऊ शकतो. एखाद्याच्या करिअरबाबत बातम्या देताना विचार करावा, असंही सतेज पाटील यांनी सांगितलं.

सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई; सतेज पाटील यांची प्रतिक्रिया काय?
सतेज पाटील
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 8:41 PM

कोल्हापूर : सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली. पण, ते अपक्ष म्हणूनचं विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आहेत. सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले, भाजपमध्ये येण्याविषयी ऑफर आली नव्हती. असं काही घडलेलं नाही. या चर्चा कारण नसताना भाजपची मंडळी पेरतात, असं मला वाटतं. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी २०-२५ वर्षे दिलेली असतात. मी १९९२ पासून एनएसयूआयपासून काम करतोय. एनएसयूआयमधून सुरू केलेल्या राजकीय कार्यकालाला आता जूनमध्ये ३० वर्षे होतील.

आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं असतं. पक्ष सोडण्याच्या एखाद्या चर्चेमुळे त्याचं राजकीय करियर खराब होऊ शकतो. एखाद्याच्या करिअरबाबत बातम्या देताना विचार करावा, असंही सतेज पाटील यांनी सांगितलं.

पण, आम्ही तसं केलं नाही

अशा चर्चा करताना गांभिर्याने करावा. राज्यात आमच्या सत्तेच्या काळात आम्ही गोकुळवर प्रशासक आणू शकलो असतो. गेल्या अडीच वर्षात राजाराम कारखान्यावर कारवाई करू शकलो असतो. पण आम्ही तसं केलं नाही.

ज्यांनी तक्रार केली त्यांचे स्वागतच. मात्र त्यात गेल्या पंचवीस वर्षाच्या कारभाराच्या देखील चौकशीच्या उल्लेख करायला हवा होता. गोकुळ दूध संघाच्या चाचणी लेखापरीक्षणावरून सतेज पाटील यांचा शौमिका महाडिक यांना टोला लगावला.

विरोधी नेत्याला नमस्कार करायचा नाही का?

यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, सत्यजित तांबे यांना पक्षाने डावललं नाही. कोणी उमेदवारी घ्यायची याचा निर्णय तांबे कुटुंबीयांनी घ्यायचा होता. कोरा एबी फॉर्म तांबे यांना दिला होता. मग तांबे यांना डावललं असं कसं म्हणता येईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वरिष्ठांनी तांबेंच्या बाबतीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे राजकीय संस्कृती आम्ही पाहतोय. विरोधी नेता आला तर नमस्कार करायचा नाही का, आम्ही असे संस्कार पाहिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.