…तर या नेत्याचं चपलेनं थोबाड फोडणार, अमोल मिटकरी यांचा हल्लाबोल

औरंगजेबाच्या साम्राज्यावर हल्ला केला. ३३ किल्ले परत मिळविले.

...तर या नेत्याचं चपलेनं थोबाड फोडणार, अमोल मिटकरी यांचा हल्लाबोल
अमोल मिटकरी
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 8:16 PM

अकोला : भाजपचे वादग्रस्त प्रवक्ते सुधांसू त्रिवेदी यांनी काल अकलेचे तारे तोडलेत. सावरकर यांच्या माफीनाम्याची तुलना शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्यासोबत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबासोबत पाच वेळा पत्रव्यवहार केल्याचंही सुधांसू म्हणाले. परंतु, इतिहास असा सांगतो की, औरंगजेबासोबत मिर्झाराजे जयसिंग किंवा अफजलखानासोबत घडलेला पत्रव्यवहार असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पत्रव्यवहार केला का, तर हो. ते खरं आहे, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

औरंगजेब यांचा आदरार्थी उल्लेखही केला. कारण शत्रूस जेरीस आणण्यासाठी तो एक गनिमी कावा होता. याची जगानं दखल घेतली. मात्र, औरंगजेबाच्या आग्रा भेटीच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत तह केला.

बादशहाच्या वाढदिवासाला भेटीला गेले.त्यानंतर पत्रव्यवहार झाला. छत्रपती शिवराय यांनी दरबारात बाणेदारपणा दाखविला. शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाचा दरबार धुळकावला असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले.

काका म्हणूनही उल्लेख केला असेल. पण, त्यानंतर अफजलखानाला प्रतापगडावर बोलावलं. त्याचा कोथडा काढला. औरंगजेबाच्या साम्राज्यावर हल्ला केला. ३३ किल्ले परत मिळविले. शिवाजी महाराजांनी पत्रव्यवहार केला. दोन पाऊलं मागे आले. पण, शत्रूवर हल्लाही तेवढ्याच ताकदीनं केला.

मात्र, सावरकर जेलमधून आले त्यानंतर त्यांनी कुठलंही बंड केलं नाही. हा इतिहास सांगतो. असं अनेक इतिहासकार म्हणतात, याची आठवण अमोल मिटकरी यांनी करून दिली. त्यामुळं शिवाजी महाराज यांच्या पाच पत्राची तुलना ही सावरकर यांच्या पत्रासोबत करणं, हे अत्यंत मुर्खपणाचं लक्षण आहे, असं मला वाटतं, असंही अमोल मिटकरी म्हणाले.

भाजपच्या नेत्यांनी याबद्दल तोंड उघडावं. भाजपची याबद्दल काय मतं आहेत. हे सांगावं. राज्यपालांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर राज्यात रोष आहे. महाराष्ट्रात आल्यास सुधांसू त्रिवेदी या नेत्याचं चपलेनं थोबाड फोडणार, असा हल्लाबोलही अमोल मिटकरी यांनी केला.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.