अमरावतीमधील महिला पोलिसांना अच्छे दिन, आता 8 तासांची ड्युटी, यशोमती ठाकूर यांच्याकडून निर्णयाचं स्वागतं

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालकांच्या संकल्पेनेनुसार अमरावती शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आता आठ तासाची ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

अमरावतीमधील महिला पोलिसांना अच्छे दिन, आता 8 तासांची ड्युटी, यशोमती ठाकूर यांच्याकडून निर्णयाचं स्वागतं
अमरावती महिला पोलीस


अमरावती: महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालकांच्या संकल्पेनेनुसार अमरावती शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आता आठ तासाची ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी महिला पोलिसांची ड्युटी 8 तास करण्याचा निर्णय घेतला आहे. चार तासांची ड्युटी कपात केल्याने महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

अमरावीच्या 275 महिला पोलिसांना लाभ

महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील 275 महिला पोलीस अंमलदारांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

निर्णय कसा झाला?

नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तासाचा ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा अशी सूचना केली होती.त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी जाहीर केली होती, त्यापाठोपाठ असा निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करणारे अमरावती शहर पोलीस आयुक्त पोलीस तिसरे ठरलं आहे.

महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

पोलीस दलात कर्तव्य करीत असलेल्या महिलांना बारा तास काम करावे लागते. महिला पोलिसांना कामाबरोबरच कौटुंबीक जबाबदारी पार पाडावी लागते. अनेक वेळा सण-उत्सव बंदोबस्त गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा 12 तासापेक्षा जास्त कर्तव्य बजावावं लागत. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस विभागाने महिलांच्या बारा तासाच्या ड्युटीचा कालावधी आता आठ तास केला आहे, अशी माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली आहे. आता महिलांना चार तासाची सवलत मिळाल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंद निर्माण झाला आहे.

यशोमती ठाकूर यांच्याकडून स्वागत

महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. पोलीस महासंचालक पांडे आणि पोलीस दलानं केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतेय, असं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. महिलांबद्दल आणि कामांबद्दल त्यांना जो ऑलराऊंडमध्ये रोल प्ले करावा लागतो याची जाणीव होत आहे. हे आपल्या सर्वांच्या वर्तनात येत आहे. असाच सर्व विचार इतर मंडळींनी करावा, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. सर्व पोलीस ठाण्यांनी हा उपक्रम राबवावा, या निर्णयामुळे महिला पोलिसांना दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

इतर बातम्या:

भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग, महापौर म्हणतात, आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली?

ग्रेड असलेल्या मुंबै बँकेची चौकशी का?, दरेकरांचा सवाल, सहकारमंत्र्यांनी नेमकं कारण सांगितलं!

Amravati Police Commissioner Aarati Singh decided to reduce duty hours of woman police

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI