विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट, प्राचीन स्वरुप जपण्यासाठी केले जाणार प्रयत्न

पुरातन विभागाने विठ्ठल व रुक्मिणी मंदिराचे इतिहासात पहिल्यांदाच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी मान्यता दिली आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट, प्राचीन स्वरुप जपण्यासाठी केले जाणार प्रयत्न
pandharpur-temple

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्राचीन स्वरूप जपण्यासाठी व सुशोभीकरण करण्यासाठी पुरातन विभागाकडून विठ्ठल व रुक्मिणी मंदिराचे इतिहासात पहिल्यांदाच स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. तशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर हे अत्यंत प्राचीन आहे. या प्राचीन मंदिराचे जतन व्हावे यासाठी हे ऑडिट करण्यात येणार आहे. (Archaeological Department approved structural audit of Vitthal Rukmini temple)

मंदिराचे मूळ रूप जतन करण्याचा प्रयत्न

पुढील अनेक पिढ्यांना या मंदिरामधील प्राचीनता तसेच कलाकुसर पाहता यावी यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे मूळ रूप जतन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी एक डीपीआर बनवला जात आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या व्यक्तींकडून हा डीपीआर मंदिर समितीला प्राप्त होईल.

प्राचिन मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार

सोबतच शेकडो वर्षाच्या प्राचीन मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिटसुद्धा करण्यात येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शेकडो वर्ष जुने आहे. मंदिरामध्ये असलेले दगडी खांब, भिंती, मंदिराचे छत तसेच मंदिराचा कळस या सर्व भागांची तपासणी भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.

मंदिरातील दगडी बांधकामाची तपासणी केली जाणार

तसेच या मंदिराची कशा पद्धतीची रचना आहे ? याची माहिती या ऑडिटच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे विशिष्ट कॅमेर्‍याच्या मदतीने मंदिरातील दगडी बांधकामाची तपासणी केली जाणार आहे. ज्याद्वारे बांधकाम केलेल्या दगडांच्या आतमध्ये काही पोकळी आहे का ? हे तपासले जाईल. तसेच भिंतीमध्ये पोकळी असल्यास त्याविषयाची दुरुस्ती तातडीने करता येईल. या सर्व कामामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील प्राचीन रूप जतन करता येईल. पुढच्या अनेक पिढ्यांना विठ्ठल मंदिर आहे त्या मुळ स्वरूपात पाहता येईल.

तसेच विठ्ठल मंदिराची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नामदेव पायरीचे सुशोभीकरण होणार आहे. भविष्यकाळात मंदिर चिरंतन टिकावे तसेच मंदिराच्या पुरातन स्वरूपाला कोणताही धक्का न लावता हे काम केले जाणार आहे. तशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

इतर बातम्या :

VIDEO : ‘मी माझ्या मर्जीने इस्लाम स्वीकारला, माझ्या कुटुंबियांपासून जीवाला धोका’, नांदेडच्या ‘त्या’ तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई महापालिकेच्या अग्नीशमन विभागात 5 हजार कोटींचा घोटाळा, भाजप आमदाराचा गंभीर आरोप

शिवसेनेची सोमवारपासून ‘शिवसंपर्क मोहीम’, आघाडी-युतीची चिंता करू नका; मुख्यमंत्र्यांनी शाखाप्रमुखांना दिले ‘हे’ आदेश

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI