एक-दोन नव्हे, बीडमधील विद्यार्थ्याला तब्बल 34 हॉलतिकिटे, परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांकही वेगवेगळे

आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होणार आहेत. याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला एक दोन नव्हे, तर तब्बल 34 हॉलतिकिटे आली आहेत. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यासमोर परीक्षा द्यायची कोठे? असा प्रश्न निर्माण झालाय.

एक-दोन नव्हे, बीडमधील विद्यार्थ्याला तब्बल 34 हॉलतिकिटे, परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांकही वेगवेगळे
Beed examinee

बीड : आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होणार आहेत. याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला एक दोन नव्हे, तर तब्बल 34 हॉलतिकिटे आली आहेत. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यासमोर परीक्षा द्यायची कोठे? असा प्रश्न निर्माण झालाय. या निमित्ताने आरोग्य विभागाचा गोंधळ आणि गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

बीड तालुक्यातील शहाबाजपूर येथे राहणाऱ्या पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याने 20 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. यासाठी 630 रुपये शुल्कही भरले होते. यात त्याने औरंगाबाद विभागाची निवड केली होती.

गट क पदासाठी 24 ऑक्टोबरला परीक्षा झाली असून, आता गट-डसाठी रविवारी परीक्षा होत आहे. परंतु यातही मोठा गोंधळ असल्याचे उघड झाले आहे. या सर्व प्रकारामुळे या विद्यार्थ्याला मनस्ताप सहन करावा लागतोय.

महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध परीक्षांच्या जाहिराती जाहीर केल्या जात आहेत. एमपीएससीनं आज महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची जाहिरात जारी केली आहे. याद्वारे पोलीस उपनिरिक्षक 376, राज्य कर निरीक्षक 190 आणि सहायक कक्ष अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.

पूर्व परीक्षा कधी होणार?

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल

पदांचा तपशील

सामान्य प्रशासन विभागाकडील सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागांवर, तर वित्त विभागाच्या राज्य कर निरीक्षक पदाची 190 आणि गृह विभागाच्या 376 पदांसाठी पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं भरता येईल.

संबंधित बातम्या :

तयारीला लागा ! 2022 मधील स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक नोव्हेंबर महिन्यात, परिपत्रक काढून MPSCची माहिती

Breaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI