Video : भंडाऱ्यात धान रोवनीला प्रभूदेवा तर आला नाही ना?, एकदा हा डान्स व्हिडीओ पाहाच…

मुक्काबला मुकाबला, ओ लैला..... ह्या गाण्यावर नृत्य करत धान पिकांची लागवड करताना हा 45 वर्षीय मनुष्य बघा...हे आहे भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपुर निवासी राजेश वासनिक...

Video : भंडाऱ्यात धान रोवनीला प्रभूदेवा तर आला नाही ना?, एकदा हा डान्स व्हिडीओ पाहाच...
मुक्काबला मुकाबला, ओ लैला..... ह्या गाण्यावर नृत्य करत धान पिकाची लागवड करताना भंडाऱ्याचे नृत्य शिक्षक...!
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 10:52 AM

भंडारा :  मुक्काबला मुकाबला, ओ लैला….. ह्या गाण्यावर नृत्य करत धान पिकाची लागवड करताना हा 45 वर्षीय मनुष्य बघा…हे आहे भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपुर निवासी राजेश वासनिक… भंडारा जिल्ह्यात R कुमार नावाने फेमस…. व्यवसायाने नृत्य शिक्षक असून मुलांना नृत्य शिकवितात तसेच स्टेज शो, ऑर्केस्टा, झाडी पट्टीतील लावणी कार्यक्रम अशा प्रकारची काम ते करतात. पण कोरोनामुळे या सगळ्यांवर निर्बंध आले, नव्हे गदा आली. मात्र आवड स्वस्थ बसू देत नाही, म्हणतात तेच खरं… त्यांनी धान रोवनी करताना सुपर डान्स केला. त्यांचा हा डान्स व्हिडीओ आता सोशल मीडियावर हिट होतोय. (bhandara Dance teacher Work in Farm Due to Corona And lockdown)

तोडीचा डान्स टिचर पण कोरोनाने लोकाच्या शेतात कामाला जाण्याची वेळ

वयाच्या 12 व्या वर्षापासून त्यांच्या डान्सची सुरुवात झाली. आज ह्या व्यवसायात त्यांना 33 वर्ष झाली. आता तर नृत्य त्यांच्या रक्तात भिनले आहे… आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नृत्य शिक्षक असून बांधावर शेतीचे काम का करताय? तर कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनने त्यांच्यावर ही बिकट परिस्थिती आली असून दुसऱ्याच्या शेतावर जाऊन त्यांना मजूर म्हणून काम करण्याची वेळ आली आहे.

भंडाऱ्यात धान लागवली प्रभू देवा तर आला नाही ना?

मात्र त्यात ही ते आपला छंद जोपासत नाचकाम करत, शेतीचे काम करताना दिसून येत आहेत. प्रभु देवा आणि मायकल जॅक्सन यांसारख्या विख्यात नृत्य दिग्गजांच्या नृत्याचे प्रकार त्यांना येत असून धानाची रोवनी करतांना दिग्गजांसारख्या हुबेहुब स्टेप्स ते करताना दिसून येत आहेत. त्यांचं नृत्य पाहून अनेकांना प्रभु देवाच्या डान्स शैलीची आठवण होत आहे. भंडाऱ्यात धान लावनीला प्रभू देवा तर आला नाही ना? असा प्रश्न गुरुजींचा डान्स व्हिडीओ पाहून पडत आहे.

कोरोनामुळे होत्याचं नव्हतं झालंय…

कोरोनामुळे दीड वर्ष झाले, सर्व व्यवहार ठप्प आहे… त्यात शाळा, ट्यूशन- डान्स क्लासेस बंद आहेत… ऑनलाइन शिक्षण सुरु असले तरी ऑनलाइन नृत्य शिक्षणावर पालकांचा भर नाही… शिवाय कोरोनाच्या भीतीने पालक आपल्या पाल्याला शिकवणी वर्गाला पाठवायला तयार नाही… कोरोना लॉकडाउनने तर स्टेज शो, ऑर्केस्टा, झाडी पट्टीतील लावणी कार्यक्रम ह्या सर्व आयोजनावर बंदी आणली असल्याने 5 सदस्यीय कुटुंब चालविन्यासाठी भंडाऱ्याचे आर कुमार आता वाटेल ते काम करायला तयार झाले आहेत.

नृत्याच्या ऊर्जेप्रमाणे शेतीचं काम ऊर्जावान होऊन जातं…!

शेतीच्या हंगाम सुरु असल्याने 350 रुपये रोजाने शेतगडी म्हणून काम करतोय…असं असलं तरी आपल्या नृत्याचा विसर मला पडला नाहीय. कुटुंबासाठी करत असलेली धावपळ बघता त्यांच्या पत्नीला त्यांचा सार्थ अभिमान वाटतोय… कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं….जगण्याची उमेद महत्त्वाची असते. नृत्य प्रयोगाने शेतीचे कामातील वातावरणही त्यांच्या नृत्याच्या ऊर्जेप्रमाणे ऊर्जावान होऊन जात असल्याची माहिती शेती मालकाने दिली आहे…

(bhandara Dance teacher Work in Farm Due to Corona And lockdown)

हे ही वाचा :

“मुख्यमंत्र्यांना 3 स्मरणपत्रं, तरीही शेतकऱ्यांना मदत नाही, उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत की काय?”

औरंगाबादचे विद्यार्थी म्हणणार ‘स्कूल चले हम…’, कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरु होणार!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.