VIDEO | दोर तुटल्याने लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन थेट तळमजल्यावर आदळली, 4 जण जखमी, भिवंडीतील घटना

भिवंडीत (Bhiwandi) पाच मजली इमारतीतील लिफ्टचे दोर तुटल्याने (Lift Collapse) लिफ्ट चौथ्या मजल्या वरुन थेट तळमजल्यावर आदळली. भिवंडी शहरातील विठ्ठल नगर येथील ग्लोबल कॉम्प्लेक्स येथील क्लासिक या पाच मजली इमारतमध्ये ही घटना घडली. लिफ्ट कोसळल्याने लिफ्टमधील चार व्यक्ती जखमी झाले आहेत.

VIDEO | दोर तुटल्याने लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन थेट तळमजल्यावर आदळली, 4 जण जखमी, भिवंडीतील घटना
Bhiwandi Lift Collapse

भिवंडी : भिवंडीत (Bhiwandi) पाच मजली इमारतीतील लिफ्टचे दोर तुटल्याने (Lift Collapse) लिफ्ट चौथ्या मजल्या वरुन थेट तळमजल्यावर आदळली. भिवंडी शहरातील विठ्ठल नगर येथील ग्लोबल कॉम्प्लेक्स येथील क्लासिक या पाच मजली इमारतमध्ये ही घटना घडली. लिफ्ट कोसळल्याने लिफ्टमधील चार व्यक्ती जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

ग्लोबल कॉम्प्लेक्समधील क्लासिक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या आरिफा यांच्या घरी ग्यारव्हीची नियाज निमित्त जेवणाचा कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांचे मित्र वसीम अन्सारी, निजाम शेख, जुबेर शेख हे त्यांच्या घरी आले होते. जेवण करुन रात्री पावणे दहा वाजता ते आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. तेव्हा तळमजल्यावर येण्यासाठी ते लिफ्टमध्ये शिरल्यानंतर गेट बंद करण्यापूर्वीच लिफ्टचे लोखंडी दोर तुटले.

लिफ्टचे लोखंडी दोर तुटल्याने लिफ्टचा संपूर्ण सांगाडा थेट 50 फूट खाली कोसळला. या दुर्घटनेत लिफ्टमध्ये असलेल्या तिन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाले आहे. या दुर्घटनेत जुबेर शेख यांचा पाय फॅक्चर झाला असून त्यांना खाजगी रुग्णालयात तर दोन जणांना शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींचे जबाब नोंदवून घेतले. तसेच, पोलिसांनी इमारतीच्या बिल्डर विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

वाशिम: चारचाकी उलटून अपघात; गर्भवती महिलेसह चार जण गंभीर जखमी

Viral: दीवच्या बीचवर पॅरासेलिंग करणं जोडप्याला भोवलं, कधीही न विसरता येणारा अपघात

बहिणीकडून ओवाळणीनंतर निघालेल्या दादाला अपघात, रात्रभर नाल्यात पडून, सकाळी मृत्यू

Published On - 7:39 am, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI