VIDEO | फडणवीस काकांकडून ‘हॅप्पी बर्थडे’चा फोन करणार असाल तरच बैठकीला जा, दापोली उपाध्यक्षांच्या मुलीचा हट्ट फडणवीसांनी पुरवला…

गुरुवारी केदार साठे यांची मुलगी प्रचितीचा वाढदिवस होता. आपल्या वाढदिवशी बाबांनी कुठेही जाऊ नये अशी तिची इच्छा होती. मात्र, पक्षाची बैठक असल्याने साठे यांना उपस्थित राहाणेही गरजेचे होते. पक्षाची बैठक महत्त्वाची होती. त्यामुळे साठे यांनी मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

VIDEO | फडणवीस काकांकडून ‘हॅप्पी बर्थडे’चा फोन करणार असाल तरच बैठकीला जा, दापोली उपाध्यक्षांच्या मुलीचा हट्ट फडणवीसांनी पुरवला...
Devendra Fadnavis

रत्नागिरी : राजकीय पक्षांच्या (Political Parties) बैठकीत नेहमी राजकारण, विरोधी पक्ष, निवडणूक इत्यादी सर्वांवर चर्चा होत असते. त्याच्या अनेक बातम्या आपण रोज पाहातो. पण, दापोलीतून सध्या एक असा व्हिडीओ पुढे आला आहे, ज्यामुळे नेते हे फक्त विरोधकांवर ताशेरेच ओढत नाहीत तर कुणाच्या चेहऱ्यावर हसू देखील आणू शकतात हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

दापोली उपाध्यक्षांच्या मुलीचा हट्ट फडणवीसांनी पुरवला

त्याचं झालं असं की, गुरुवारी कोकण विभागातील विविध जिल्ह्यांच्या भाजपच्या आढावा बैठकी होत्या. भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस स्वत: या आढावा बैठकी घेणार होते. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना होत्या. दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठेसुद्धा या बैठकीला निमंत्रित होते.

पण, गुरुवारी केदार साठे यांची मुलगी प्रचितीचा वाढदिवस होता. आपल्या वाढदिवशी बाबांनी कुठेही जाऊ नये अशी तिची इच्छा होती. मात्र, पक्षाची बैठक असल्याने साठे यांना उपस्थित राहाणेही गरजेचे होते. पक्षाची बैठक महत्त्वाची होती. त्यामुळे साठे यांनी मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, प्रचिती वेगळाच हट्ट धरुन बसली. “जर, देवेंद्र फडणवीस काका मला शुभेच्छा देणार असतील, तरच मी तुम्हाला परवानगी देईन”, असं तिने बाबांना सांगितलं.

मुलीने हट्ट केल्यावर आता साठे काय करणार. त्यांनीही प्रचितीला वचन दिले आणि मगच ते बैठकीला येऊ शकले. बैठक संपल्यानंतर केदार साठे यांनी हा किस्सा देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकला. फडणवीसांनीही दापोली उपाध्यक्षांच्या मुलीचा हट्ट पुरवण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर केदार साठे यांनी प्रचितीला व्हिडीओ कॉल लावला आणि फडणवीसांनी तिच्याशी संवाद साधला.

पाहा हा गोंडस व्हिडीओ –

फडणवीसांना गुलाबजाम खाण्याचं निमंत्रण

या दोघांचे संभाषण इतकं गोड होतं की कार्यकर्तेही कौतुक करु लागले. यावेळी फडणवीसांनी प्रचितीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर, प्रचितीने त्यांना घरी गुलाबजाम खायला येण्याचं आमंत्रण दिलं.

या गोंडस घटनेचा व्हिडीओ भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच, भारतीय जनता पार्टी हा एक विशाल परिवार आहे, असंही म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

अमरावती हिंसाचार हा संयोग नव्हे तर प्रयोग होता, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप; ‘अर्बन नक्षलवादा’वर जोरदार प्रहार

Video : एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीचे नेते, पण भाजप मनातून जाता जाईना!

Published On - 7:22 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI