खरिप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची? आरोग्य अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

खरिप हंगाम जवळ येत असल्यानं शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागत आणि इतर कामं सुरु झालेली आहेत. covid protocols Kharip Season

खरिप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची? आरोग्य अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 5:58 PM

बुलडाणा: महाराष्ट्र सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत आहे. आता खरिप हंगाम जवळ येत असल्यानं शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागत आणि इतर कामं सुरु झालेली आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खरिप हंगामासाठी बी-बियाणं आणि खते खरेदी करताना कोरोना नियमांचं पालन करावं, अस आवाहन बुलडाणा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र सांगळे यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी सुरक्षित राहून मशागत करावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. (Buldana District Health Officer Rajendra Sangle appeal to farmers follow covid protocols during Kharip Season farm related works)

खरिप हंगामातील कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग

खरिप हंगाम तोंडावर आला असून त्यासाठी आता शेतकऱ्यांची शेती मशागतीसाठी लगबग सुरू झालीय. शेतकऱ्यांनी बी बियाणे तसेच रासायनिक खतांसाठी कृषी केंद्रावर जाताना सुरक्षित अंतर पाळून कोरोना नियमांचे पालन करावे. त्याचबरोबर शेतात मशागत करताना देखील होईल तेवढ्या प्रमाणात सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असं आवाहन डॉ.राजेंद्र सांगळे यांनी केलं आहे.

लक्षण आढळल्यास चाचणी करा

शेतकऱ्यांनी कोरोना संदर्भातील लक्षणे आढळल्यास दिरंगाई करु नये. तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन चाचणी करून घ्यावी आणि उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.

ग्रामीण भागात संसर्ग अधिक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कोरोणा रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा आणि सुरक्षित रहावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत वारंवार करण्यात येत आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या घटतेय

राज्यात मंगळवारी 40 हजार 956 नवे कोरोना रुग्ण सापडले, तर कोरोनामुक्तांची संख्या 71 हजार 966 झाली होती. तर राज्यात 793 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय. राज्यात सध्या 5 लाख 58 हजार 996 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 51 लाख 79 हजार 929 कोरोना रुग्णांना संसर्ग झालाय. कोरोनातून मुक्त झालेल्यांची एकूण संख्या 45 लाख 41 हजार 391 एवढी आहे. त्याचवेळी कोरोनानं राज्यात आतापर्यंत 77 हजार 191 लोकांचा मृत्यू झालाय.

संबंधित बातम्या:

दागिणे एकाचे, सोडवले दुसऱ्यानंच, बुलडाण्यातील ICICI बँकेत 44 तोळे सोनं चोरीनं खळबळ

गाव कारभाऱ्यांनो, जय-परायज विसरुन संधीचं सोनं करा; अजितदादांचं आवाहन

(Buldana District Health Officer Rajendra Sangle appeal to farmers follow covid protocols during Kharip Season farm related works)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.