लोकआयुक्त कायद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी, अण्णा हजारे म्हणतात, ही समाधानाची गोष्ट पण,…

असा हा क्रांतीकारी कायदा आहे. लोकआयुक्तांचं काम हे भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं असणार आहे.

लोकआयुक्त कायद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी, अण्णा हजारे म्हणतात, ही समाधानाची गोष्ट पण,...
अण्णा हजारे
Follow us
| Updated on: Dec 19, 2022 | 4:37 PM

अहमदनगर : लोकआयुक्त कायद्याला राज्य मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. या कायद्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लढा दिला होता. लोकआयुक्त कायदा होणार आहे. त्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ही समाधानाची गोष्ट असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं. लोकआयुक्त हा स्वायत्तता असणारा कायदा आहे. त्याचा दर्जा उच्च न्यायालयाच्या बरोबर आहे. कायदे खूप आहेत. पण, पालन केलं नाही, तर कोणी विचारत नाहीत, अशी खंतही अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

लोकआयुक्त नेमल्यास त्यांना स्वायत्तता मिळणार आहे. जेकाही दिसेल त्याच्यावर कारवाई करते. असा हा क्रांतीकारी कायदा आहे. लोकआयुक्तांचं काम हे भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं असणार आहे. केंद्र सरकारचे अधिकारी आणि मंत्री लोकपालाच्या कक्षात येतील. तसेच राज्यातील अधिकारी आणि मंत्री लोकआयुक्तांच्या कक्षात येतील. यासाठी अण्णा हजारे यांनी मोठा संघर्ष केला होता.

पक्ष, व्यक्ती यांच्याशी काही घेणंदेणं नाही. सर्व पक्षांच्या विरोधात मी आंदोलनं केलीत. त्यासाठी मी समाज आणि राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवलं. या कायद्यासाठी आंदोलन २०११ मध्ये केलं होतं. आता याला १२ वर्षे झालीत. १२ वर्षांच्या तपानंतर सरकारनं हा निर्णय घेतला. कोणत्याही गोष्टीसाठी तप करावं लागतं. आता हे तप पूर्ण झाल्याचंही अण्णा हजारे यांनी सांगितलं.

सत्तेमध्ये बुद्धी विचार कुठं घेऊन जातील, काही सांगता येत नाही. ज्यांना देशासाठी काही करावसं वाटतं, तीच माणसं अशाप्रकारचे निर्णय घेतात.  देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिलं होतं. त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चार अधिकारी आणि इतर जणांनी मिळून ड्राफ्ट तयार केला. आता तो विधानसभेत गेला.

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.