क्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण

क्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन सांगलीच्या कुंडल गावचे सुपुत्र क्रांतिवीर रामभाऊ लाड यांनी आज 22 जून रोजी 100 व्या वर्षात पदार्पण केले. (Capt. Krantiveer Rambhau Lad Completed 99 year of Age)

क्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन क्रांतिवीर रामभाऊ लाड यांचं शंभरीत पदार्पण
क्रांतिसिंहाच्या पत्रीसरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन सांगलीच्या कुंडल गावचे सुपुत्र क्रांतिवीर रामभाऊ लाड यांनी आज 22 जून रोजी 100 व्या वर्षात पदार्पण केले.

सांगली : क्रांतिसिंहाच्या पत्री सरकारमधील तुफान दलाचे कॅप्टन सांगलीच्या कुंडल गावचे सुपुत्र क्रांतिवीर रामभाऊ लाड (Rambhau Lad) यांनी आज 22 जून रोजी 100 व्या वर्षात पदार्पण केले. 1942 च्या स्वातंत्र्य संग्राम तसेच अनेक संग्रामात आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे मोठे योगदान आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारमध्ये ते तुफान सेनेचे कॅप्टन म्हणून काम करत होते. (Capt. Krantiveer Rambhau Lad Completed 99 year of Age)

कॅप्टन लाड यांचं शंभरीत पदार्पण, सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन

त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुंडलमध्ये सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. सामाजिक उपक्रमांनी त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन आहे. स्वातंत्र्य पुर्व काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या समवेत कॅप्टन रामभाऊ लाड सरांनी काम केले आहे.

कुंडल गावचे थोर स्वातंत्र सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांनी गोवा मुक्ती संग्राम, हैद्राबाद मुक्ती संग्राम यासह शेणोली जवळ इंग्रजांचा खजिना घेऊन जाणारी रेल्वे अडवून ती लुटली होती. नाट्यमय रित्या रेल्वेसमोर दगडांचा खच टाकून रेल्वे लुटण्यात कॅप्टन लाड यांची तुफान सेना आघाडीवर होती. हा खजाना लुटून त्याचा वापर कॅप्टन लाड यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी केला होता. असे थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड हे आपल्या वयाची 99 वर्षे पूर्ण करीत आज 22 जून रोजी शंभरीत पदार्पण केले आहे.

रामभाऊ लाड यांच्या शंभरीसाठी कुंडल गाव सज्ज

यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी आणि कुंडल गावातही विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. क्रांतीसिंहाच्या सोबत काम करणारे एक जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी म्हणून सांगली सातारा जिल्ह्यात कॅप्टन लाड यांची ख्याती आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या सर्व लढ्यात सहभागी असणारे कॅप्टन रामभाऊ लाड यांच्या शंभरीसाठी कुंडल गाव सज्ज झाले होते.

(Capt. Krantiveer Rambhau Lad Completed 99 year of Age)

हे ही वाचा :

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लस घेणं अत्यावश्यक; आमदार रमेश पाटलांचे नागरिकांना आवाहन

पाच वर्षांपूर्वी दोन जुळे, आता तिळ्यांना जन्म, जुन्नरमध्ये महिलेची यशस्वी प्रसुती